FIFA World Cup Final 2022: पराभूत फ्रान्सचे जिंकले २४८ कोटी रुपये, जग्गजेत्या अर्जेंटिनाचा थक्क करणारा आकडा...!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2022 11:54 PM2022-12-18T23:54:12+5:302022-12-18T23:54:29+5:30
लिओनेल मेस्सीचा अखेरच्या वर्ल्ड कप स्पर्धेत जेतेपद पटकावण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अर्जेंटिनाच्या प्रत्येक खेळाडूने कोणतीच कसर सोडली नाही.
लिओनेल मेस्सी ज्या स्वप्नाच्या शोधात इतकी वर्ष अथक परिश्रम करत होता अखेर ते आज पूर्ण झाले... लिओनेल मेस्सी की कायलिन एमबाप्पे हा सामना रंगेल असे वाटलेले, पण वातावरण पहिल्या सेकंदापासून ते रेफरीची अखेरची शीटी वाजेपर्यंत मेस्सीमय राहिले आणि पुढील अनेक वर्ष ते तसेच राहिल याची काळजी मेस्सीने आजच्या खेळातून घेतली.
2014ला वर्ल्ड कप विजयाचं भंगलेलं स्वप्न पूर्ण करण्याच्या निर्धारानेच अर्जेंटिनाचा संघ मैदानावर उतरला. लिओनेल मेस्सीचा अखेरच्या वर्ल्ड कप स्पर्धेत जेतेपद पटकावण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अर्जेंटिनाच्या प्रत्येक खेळाडूने कोणतीच कसर सोडली नाही. फ्रान्सकडून तोडीसतोड खेळ झाला अन् कायलिन एमबाप्पे एकटा भिडला. 120 मिनिटांच्या सामन्यात 3-3 अशी बरोबरी झाली अन् पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाने बाजी मारली.
फुटबॉलमध्ये अखेरच्या सेंकदातही काही होऊ शकते याची प्रचिती वर्ल्ड कप फायनलमध्ये आली. 80व्या मिनिटापर्यंत 2-0 अशा आघाडीवर असलेल्या अर्जेंटिनाला 1 मिनिट व 37 सेकंदात दोन धक्के बसले. कायलिन एमबाप्पेच्या दोन गोलने फ्रान्सच्या पाठीराख्यांमध्ये प्राण फुंकले.
8 मिनिटांच्या भरपाई वेळेत दोन्ही संघांच्या गोलरक्षकाने एकेक गोल रोखला अन् सामना अतिरिक्त 30 मिनिटांत गेला. पहिली 15 मिनिटे तोडीसतोड खेळ झाल्यानंतर लिओनेल मेस्सीची जादू पुन्हा चालली अन् त्याने 108व्या मिनिटाला गोल करून अर्जेंटिनाला वर्ल्ड कप जिंकून दिला असे वाटत असताना एमबाप्पेने गोल करून सामना 120 मिनिटांच्या खेळात 3-3 असा बरोबरीत सोडवला
पेनल्टीचा थरार...
कायलिन एमबाप्पे - 1-0 ( फ्रान्स )
लिओनेल मेस्सी - 1-1 ( अर्जेंटीना)
किंग्स्ली कोमन ( संधी गमावली ) - 1-1 ( फ्रान्स)
पॉलो डिबाला - 1-1 ( अर्जेंटिना)
आरेलोना टी चौमेनी ( संधी गमावली ) - 1-2 ( फ्रान्स)
लिएंड्रो पेरेडेस - 3-1 ( अर्जेंटीना)
रँडल कोलो मौनी - 2-3 ( फ्रान्स)
गोंझालो मॉटेई - 4-2 ( अर्जेंटीना)
अर्जेंटिना संघाला 347 कोटी रुपये बक्षिस-
फिफा विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यात विजेता झालेल्या अर्जेंटिना संघाला 347 कोटी रुपये बक्षिस म्हणून देण्यात आले आहे. तर उपविजेत्या फ्रान्सच्या संघला 248 कोटी रुपये देण्यात आले आहे. तिसरं स्थान पटकावलेल्या क्रोएशियाला 223 कोटी रुपये आणि चौथ्या स्थानावर असलेल्या मोरक्को 206 कोटी रुपये बक्षिस म्हणून देण्यात आले.
वर्ल्ड कप विजेते संघ-
ब्राझील - 5 (1958, 1962, 1970, 1994, 2002 )
जर्मनी - 4 (1954, 1974*, 1990, 2014)
इटली - 4 (1934*, 1938, 1982, 2006)
अर्जेंटीना - 3 (1978*, 1986, 2022)
फ्रान्स - 2 (1998*, 2018)
उरुग्वे - 2 (1930*, 1950)
इंग्लंड - 1 (1966*)
स्पेन - 1 (2010)
18 कॅरेट सोन्याचा वापर-
फिफा वर्ल्डकपच्या ओरिजनल ट्रॉफीचं वजन जवळपास 6.175 किलो इतकं आहे आणि ती बनवण्यासाठी 18 कॅरेट सोन्याचा वापर करण्यात आला आहे. ट्रॉफीची लांबी 36.8 सेंटीमीटर आणि व्यास 13 सेंटीमीटर इतका आहे. ट्रॉफीच्या बेसवर मॅलाकाइट स्टोनचे दोन स्तर आवरण देण्यात आलं आहे. 1994 साली या ट्रॉफीमध्ये थोडा बदल करण्यात आला आणि विजेत्या संघाचं नाव लिहिण्यासाठी ट्रॉफीच्या खाली एक प्लेट लावण्यात आली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"