Fifa World Cup, Portugal C. Ronaldo : ख्रिस्तियानो रोनाल्डोचा वर्ल्ड रेकॉर्ड! पेले, मेस्सी यांच्यासह कोणालाच जमला नाही हा पराक्रम, Video
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 11:17 PM2022-11-24T23:17:24+5:302022-11-24T23:17:40+5:30
Fifa World Cup, Portugal vs Ghana C. Ronaldo : फुटबॉल कारकीर्दित अनेक विक्रम, अनेक चषकं नावावर असलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या ( Cristiano Ronaldo) चषकाच्या कपाटात वर्ल्ड कप नाही...
Fifa World Cup, Portugal vs Ghana C. Ronaldo : फुटबॉल कारकीर्दित अनेक विक्रम, अनेक चषकं नावावर असलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या ( Cristiano Ronaldo) चषकाच्या कपाटात वर्ल्ड कप नाही... कतार येथील हा वर्ल्ड कप कदाचित पोर्तुगालचा स्टार रोनाल्डो याचा अखेरचा असल्याने त्याला जेतेपदाची भेट देण्यासाठी सारेच प्रयत्नशील आहेत. त्याची प्रचिती घाना विरुद्धच्या पहिल्या साखळी सामन्यात आली. रोनाल्डोने या सामन्यात पेनल्टीवर गोल करून विश्वविक्रम नावावर केला.
ख्रिस्तियानो रोनाल्डोने केलेला गोल रेफरीने नाकारला; पोर्तुगालच्या समर्थकांनी निषेध नोंदवला, Video
⚽️📸 pic.twitter.com/eDjWUKf54A
— كأس العالم FIFA 🏆 (@fifaworldcup_ar) November 24, 2022
आजच्या सामन्यात सर्वांचे लक्ष्य ३७ वर्षी ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्यावरच होते. कारकिर्दीतील अखेरच्या वर्ल्ड कप स्पर्धेत रोनाल्डोची कामगिरी कशी होते आणि तो वर्ल्ड कप उंचावतो का, याचीच सर्वांना उत्सुकता आहे. घानाविरुद्धच्या सामन्यात रोनाल्डोने पहिल्या हाफमध्ये लौकिकास साजेसा खेळा केला, परंतु पोर्तुगालला गोल करता आला नाही. ३१ व्या मिनिटाला ख्रिस्तीयानो रोनाल्डोने गोल केला होता, परंतु चेंडू मिळवण्यासाठी त्याने घानाच्या खेळाडूला धक्का दिल्याने रेफरीने तो गोल अमान्य ठरवला. पोर्तुगालने पहिल्या हाफमध्ये चेंडूवर सर्वाधिक ताबा राखताना ४०० पासेस दिले.
दुसऱ्या हाफमध्ये घानाचा खेळ उंचावलेला पाहायला मिळाला आणि त्यामुळे पोर्तुगालवर दडपण वाढलेले दिसले. त्यात घानाच्या खेळाडूंनी प्रतिस्पर्धी खेळाडूंना शारीरिक ईजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे सामन्यातील वातावरण तापले होते. पण, ६५व्या मिनिटाला ख्रिस्तियानो रोनाल्डोने सर्वांना गप्प केले... रोनाल्डोला पेनल्टी क्षेत्रात पाडण्याची चूक घानाच्या बचावपटूकडून झाली आणि पोर्तुगालला पेनल्टी मिळाली. हाती आलेली संधी न सोडणे हेच रोनाल्डोने आतापर्यंत दाखवले आहे. त्याने गोल करून पोर्तुगालला १-० अशी आघाडी मिळवून दिली.
Cristiano Ronaldo is first man how goals score in five World Cups#CR7𓃵#Ronaldo𓃵#Portugal#CR7pic.twitter.com/W6DUqbHXyw
— sharee (@shareeofficial1) November 24, 2022
पाच वेगवेगळ्या वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये ( २००६, २०१०, २०१४, २०१८ व २०२२) गोल करणारा रोनाल्डो हा जगातील पहिला खेळाडू ठरला. त्याने लिओनेल मेस्सी ( ४), मिरोस्लाव्ह क्लोस, पेले व उवे सीलर यांना मागे टाकले.
वर्ल्ड कप स्पर्धेत गोल करणारा रोनाल्डो हा दुसरा ( ३७ वर्ष व २९२ दिवस) वयस्कर खेळाडू ठरला. कॅमेरूनच्या रॉजर मिला याने १९९४ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत ४२ वर्ष व ३९ दिवसांचा असताना गोल केला होता. पण, युरोपियन देशांमध्ये गोल करणारा रोनाल्डो वयस्कर खेळाडू ठरला, त्याने स्वीडनच्या ( १९५८ साली) गनर ग्रेन ( ३७ वर्ष व २३६ दिवस) याला मागे टाकले. ७७ व्या मिनिटाला आंद्रे आयेवकडून बरोबरीचा गोल झाला अन् पोर्तुगालच्या ताफ्यात पुन्हा चिंतेचं वातावरण पसरले. पण, पुढच्याच मिनिटाला जोओ फेलिस्कने सुरेख कौशल्य दाखवताना पोर्तुगालला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. पुढच्याच मिनिटाला राफेल लिओने गोल करून पोर्तुगालची आघाडी ३-१ अशी भक्कम केली.