FIFA World Cup Qatar vs Equador: यजमान कतारचा पहिल्याच सामन्यात पराभव; इक्वेडोर फुटबॉल सामना जिंकला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 11:42 PM2022-11-20T23:42:18+5:302022-11-20T23:43:55+5:30

स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात यजमान प्रथमच हरले. यापूर्वी वर्ल्ड कपच्या 22 लढतीत एकाही यजमानांना हार मानावी लागली नव्हती. 

FIFA World Cup Qatar vs Ecuador: Qatar loses in first match by 2-0; Ecuador won the football match | FIFA World Cup Qatar vs Equador: यजमान कतारचा पहिल्याच सामन्यात पराभव; इक्वेडोर फुटबॉल सामना जिंकला

FIFA World Cup Qatar vs Equador: यजमान कतारचा पहिल्याच सामन्यात पराभव; इक्वेडोर फुटबॉल सामना जिंकला

googlenewsNext

फिफा वर्ल्ड कपला आजपासून सुरुवात झाली आहे. उद्घाटनानंतर पहिलाच सामना यजमान कतार आणि इक्वेडोरमध्ये खेळविण्यात आला. हा सामना इक्वेडोरने २-० जिंकला असून कतारचा दारुण पराभव झाला आहे. 

एनर व्हलेनसियाच्या दोन गोल नोंदविले. याच गोलच्या जोरावर इक्वेडोरने २-० अशा फरकाने यजमान कतारवर विजय मिळवला. स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात यजमान प्रथमच हरले. यापूर्वी वर्ल्ड कपच्या 22 लढतीत एकाही यजमानांना हार मानावी लागली नव्हती. 

यापूर्वीच्या २१ वर्ल्ड कप स्पर्धेत २०वेळा यजमान देशाने दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. यजमानपद मिळवताना प्रथमच खेळणारा कतार हा तिसरा देश ठरला. यापूर्वी उरुग्वे ( १९३०) व इटली ( १९३४) यांनी यजमानपद भूषवण्यासोबतच प्रथमच वर्ल्ड कप खेळला होता.

स्पर्धेत २२ वेळा यजमान देशाने स्पर्धेची सुरुवात केली आणि एकही सामना यजमानांनी गमावलेला नाही. २२ पैकी १६ सामने यजमानांनी जिंकले, तर ६ सामने अनिर्णित राहिले. कतार हा पहिला अरेबियन देश आहे की जो फुटबॉल वर्ल्ड कपचे यजमानपद भूषवित आहे. यापूर्वी 2002 मध्ये कोरिया/जपान या आशियाई खंडातील देशाने वर्ल्ड कप स्पर्धेचं यजमानपद भूषविले होते. ९२ वर्षांच्या इतिहासात यजमानांना सलामीच्या सामन्यात हरवणारा इक्वेडोर पहिलाच संघ ठरला.

Web Title: FIFA World Cup Qatar vs Ecuador: Qatar loses in first match by 2-0; Ecuador won the football match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.