FIFA World Cup Quarter finals : ... अन् इब्राहिमोविचचे चॅलेंज बेखॅमने स्वीकारले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2018 20:30 IST2018-07-07T20:29:23+5:302018-07-07T20:30:00+5:30
फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत माजी विजेता इंग्लंड आणि स्वीडन हे शनिवारी समोरासमोर आले. या लढतीचा निकाल काय लागेल, कोण बाजी मारेल, यावर चर्चा रंगत असताना इंग्लंड आणि स्वीडन संघाच्या माजी खेळाडूंमध्ये निकालावरून पैज लागली आहे.

FIFA World Cup Quarter finals : ... अन् इब्राहिमोविचचे चॅलेंज बेखॅमने स्वीकारले
समारा - फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत माजी विजेता इंग्लंड आणि स्वीडन हे शनिवारी समोरासमोर आले. या लढतीचा निकाल काय लागेल, कोण बाजी मारेल, यावर चर्चा रंगत असताना इंग्लंड आणि स्वीडन संघाच्या माजी खेळाडूंमध्ये निकालावरून पैज लागली आहे.
स्वीडनकडून सर्वाधिक 62 गोल करणा-या झाल्टन इब्राहिमोविचने राष्ट्रीय संघाला पाठिंबा दर्शवताना इंग्लंडच्या माजी कर्णधार डेव्हिड बेखॅमला चॅलेज दिले. इंग्लंड जिंकल्यास तु सांगशील त्या हॉटेलमध्ये तुला डिनरला घेऊन जाईन. पण, स्वीडन जिंकल्यास मला जे हव आहे, ते तू मला खरेदी करून दे, असे इब्राहिमोविचने चॅलेंज दिले.
Yo @davidbeckham if @England wins I buy you dinner where ever you want in the world, but if Sweden wins you buy me what ever I want from @IKEASverige ok? pic.twitter.com/9z9xx89JjS
— Zlatan Ibrahimović (@Ibra_official) July 6, 2018
बेखॅमनेही हे आव्हान स्वीकारले. स्वीडन जिंकल्यास मी स्वतः तुझ्यासोबत येईन आणि तुला हव ते खरेदी करून देईन. पण इंग्लंड जिंकल्यास तु त्या सामन्यात इंग्लंडची जर्सी घालून माझ्यासह स्टेडियमवर ये, असे चॅलेंज बेखॅमने दिले.
The terms of the deal have been set 😂 #SWEENGpic.twitter.com/9bJ3D5nHWv
— LA Galaxy (@LAGalaxy) July 6, 2018