फिफा विश्वचषकाचा दौरा दिल्लीपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 02:11 AM2017-08-08T02:11:38+5:302017-08-08T02:12:01+5:30

देशात पहिल्यांदाच होणाऱ्या १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषकाच्या सहा शहरांच्या दौऱ्याला १८ आॅगस्टपासून दिल्ली येथून सुरुवात होईल. स्थानिक आयोजन समितीने (एलओसी) सोमवारी ही घोषणा केली.

 FIFA World Cup tour from Delhi | फिफा विश्वचषकाचा दौरा दिल्लीपासून

फिफा विश्वचषकाचा दौरा दिल्लीपासून

Next

नवी दिल्ली : देशात पहिल्यांदाच होणाऱ्या १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषकाच्या सहा शहरांच्या दौऱ्याला १८ आॅगस्टपासून दिल्ली येथून सुरुवात होईल. स्थानिक आयोजन समितीने (एलओसी) सोमवारी ही घोषणा केली. या दौऱ्यात ९ हजार किमीचा प्रवास ४० दिवसांत केला जाईल. फुटबॉल चाहत्यांना सहा शहरांत ‘फिफा चषका’ला पाहता येईल; जेथे भारत आपल्या गटातील सामने खेळेल. दिल्लीत हा चषक १७ ते २२ आॅगस्टपर्यंत असेल. गुवाहाटी येथे २४ ते २९ आॅगस्टपर्यंत चषक असेल. त्यानंतर हा चषक कोलकाता येथे ३१ आॅगस्ट ते ५ सप्टेंबरपर्यंत ठेवण्यात येईल. गोव्यात हा चषक १४ ते १९ सप्टेंबरदरम्यान असेल. या दौऱ्याचा शेवट कोची येथे होईल. येथे २१ ते २७ सप्टेंबरपर्यंत चषक ठेवण्यात येईल. दरम्यान, भारतात प्रथमच होणारी ही स्पर्धा ६ ते २८ आॅक्टोबर दरम्यान खेळविण्यात येणार आहे.

हा आपल्यासाठी दुर्मिळ क्षण आहे. आशा आहे की, मोठ्या संख्येने सहा शहरांतील लोक फिफाचा विश्वचषक पाहतील. या रॅलीमुळे देशात फुटबॉलची लोकप्रियताही वाढेल.
- प्रफुल्ल पटेल,
स्थानिक आयोजन समितीचे प्रमुख

इंग्लंड टीमच्या मदतीसाठी तयार : कॉन्स्टेंटाइन

1भारताचे प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टेंटाइन यांनी दावा केला आहे की, फुटबॉल महासंघाने त्यांना आगामी फिफा १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत इंग्लंड संघाच्या मदतीसाठी आग्रह धरला आहे. ते यासाठी तयारही आहेत.
2कॉन्स्टेंटाइन यांच्या हवाल्याने एका वृत्तपत्राने म्हटले की, १७ वर्षांखालील विश्वचषक भारतात होत आहे. ‘एफए’ यांनी आदेश दिला आहे की मी संघाची मदत करावी. मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करीन. भारताच्या वरिष्ठ संघाशी दुसऱ्यांदा जुळणाºया इंग्लंडच्या ५४ वर्षीय या प्रशिक्षकाने आपल्या देशात ओळख न मिळाल्याच्या कारणावरून नाराजी व्यक्त केली होती.
3कॉन्स्टेंटाइन म्हणाले की, मी हे म्हणत नाही की मला इंग्लंडचा प्रशिक्षक बनवा; पण आपल्याकडे अशा काही व्यक्ती असतील की ज्या संघाला मदत करू शकतात, त्यांनी मदत करायला हवी. जर तुम्ही इंग्लंडचे आहात तर तुम्ही आपल्या संघासाठी मदत करायला हवी. फिफाचे इन्स्ट्रक्टर कॉन्स्टेंटाइन नेपाळ, मालदीव, सुदान आणि रवांडाचे प्रशिक्षक राहिले आहेत.

Web Title:  FIFA World Cup tour from Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.