इतिहासात पहिल्यांदाच विश्वचषक फुटबॉल स्पर्धा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 10:42 PM2018-07-13T22:42:20+5:302018-07-13T22:42:39+5:30
फिफाचे अध्यक्ष जिअॅनी इन्फँटीनो यांनी 2022ची फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 21 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर या कालावधीत खेळवण्यात येणार असल्याचे शुक्रवारी जाहीर केले
केप टाऊन - फिफाचे अध्यक्ष जिअॅनी इन्फँटीनो यांनी 2022ची फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 21 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर या कालावधीत खेळवण्यात येणार असल्याचे शुक्रवारी जाहीर केले. इतिहासात पहिल्यांदाच फुटबॉल विश्वचषक स्पर्धा जून-जुलै ऐवजी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात घेण्यात येणार आहे. या निर्णयामुळे युरोपातील फुटबॉल हंगामाला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
FIFA president Gianni Infantino has announced that the 2022 World Cup in Qatar will take place from November 21st to December 18th.
— 🇧🇪 vs 🏴 Football Tweet (@Football__Tweet) July 13, 2018
🌎🏆 pic.twitter.com/5VGtxbFVfQ