बाबो; अर्जेंटिनाच्या फुटबॉलपटूचे 'एलियन'नं केलेलं अपहरण; खेळाडूचा धक्कादायक दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 12:09 PM2020-06-17T12:09:40+5:302020-06-17T12:10:59+5:30
दिएगो मॅराडोना यांनीही असाच एक किस्सा सांगितला होता..
अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू गुइलीर्मो मारियोने एलियनने अपहरण केल्यामुळे सराव सत्राला उपस्थित राहू शकलो नव्हतो, असा दावा केल्याची माहिती सहकारी गुस्तावो लोरेंझेट्टीने दिली. दक्षिण अमेरिकन संघाकडून त्याने अनेक ट्रॉफी जिंकल्या आणि जॉर्ज सॅम्पोली यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने २०१०-२०१३ या कालावधीत युनिव्हर्सिटी दी चीली संघाचे प्रतिनिधित्व केले.
सरावाला दांडी मारण्या मागे मारियोने अजब कारण सांगितले होते. लोरेंझेट्टीने सांगितले की," एलियनने अपहरण केल्यामुळे सरावाला येऊ शकलो नाही, असे कारण मारियोने दिले होते. त्याने हा सर्व प्रसंग रंजकपणे सर्वांना सांगितला. एलियनने दोन दिवस अपहरण करून ठेवले होते, असे त्याने सांगितले. सराव सत्राला दांडी मारणाऱ्या खेळाडूंपैकी तो नव्हता. त्याने या किस्सा एवढा मसाला लावून सांगितला की सर्वांनी विश्वास ठेवला."
"एलियन माझा आत्मा घेऊन गेले आणि त्याच परीक्षण केले. त्यानंतर मला सोडले, असे मारियो काहीतरी सांगत होता. एलियनवर माझाही विश्वास होता. त्याने हा किस्सा अशा पध्दतीने सांगितला की सर्वांनी विश्वास ठेवला," असेही लोरेंझेट्टीने सांगितले.
अर्जेंटिनाचे दिग्गज फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांनीही UFOनं त्यांना घरी सोडल्याचा दावा केला होता. 59 वर्षीय मॅराडोना यांनी एका चॅनलला सांगितले होते की,''एक दिवस मी खूप मद्यपान केलं होतं. तीन दिवसानंतर UFOनं मला घरी सोडलं.''
विराट कोहली, रोहित शर्मासह क्रीडा विश्वानं शहीद जवानांना वाहिली श्रद्धांजली
54 लाख लोकांनी पाहिलंय 'या' पठ्ठ्याचं सेलिब्रेशन; असं आहे तरी काय Viral Videoत?