फुटबॉल प्रशिक्षक कॉन्स्टेनटाईन यांचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 06:45 AM2019-01-16T06:45:24+5:302019-01-16T06:45:36+5:30

बहरिनकडून ०-१ ने पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतीय फुटबॉल संघ आशिया चषक स्पर्धेबाहेर पडला. अ गटाच्या अखेरच्या सामन्यात निर्धारित वेळेत गोल झाला नाही.

Football coach Constantine resigns | फुटबॉल प्रशिक्षक कॉन्स्टेनटाईन यांचा राजीनामा

फुटबॉल प्रशिक्षक कॉन्स्टेनटाईन यांचा राजीनामा

Next

शारजाह : बहरिनकडून ०-१ ने पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतीय फुटबॉल संघ आशिया चषक स्पर्धेबाहेर पडला. अ गटाच्या अखेरच्या सामन्यात निर्धारित वेळेत गोल झाला नाही. अतिरिक्त वेळेत बहरिनने पेनल्टीवर गोल करत भारताता नमविले. या पराभवानंतर अत्यंत भावुक अंत:करणाने त्यांनी पदाचा राजीनामा दिला.


कॉन्स्टेनटाईन म्हणाले, ‘मी राजीनामा देत आहे, मी येथे चार वर्षांपासून असून माझे लक्ष्य एएफसी आशिया चषकाची पात्रता फेरी गाठण्याचे होते. मला माझ्या खेळाडूंवर गर्व वाटतो. मला जे सांगण्यात आले त्यापेक्षा अधिक केले.’


कॉन्स्टेनटाईन यांचा करार ३१ जानेवारी रोजी संपणार होता. त्यांनी २०१५ पासून मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळली होती. त्यांचा कार्यकाळ दोनदा वर्षभरासाठी वाढविण्यात आला. याआधी २००२ ते २००५ या कालावधीतही ते भारताचे प्रशिक्षक होते. त्यांच्या मार्गदर्शनात भारताने फिफा क्रमवारीत १७३ वरून ९६ व्या स्थानावर झेप घेतली.


प्रशिक्षक पुढे म्हणाले,‘भारत सोडण्याचे दु:ख आहे. विविध स्पर्धांदरम्यान खेळाडू आणि सपोर्ट स्टाफचा पाठिंबा लाभला. मी सहा वर्षांपासून घरी गेलो नाही. आजच माझ्या पत्नीचा वाढदिवस आहे. मी तीन मुलींना तीन-चार महिन्यात एकदा पाहतो. आता कुटुंबासोबत वेळ घालवू इच्छितो.’ (वृत्तसंस्था)

टिष्ट्वटरवरुन मिळाली माहिती
अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे महासचिव कुशाल दास यांनी अधिकृत टिष्ट्वटर हॅन्डलवर कॉन्स्टेनटाईन यांचा राजीनामा स्वीकार केल्याचे स्पष्ट केले. ‘आम्हाला त्यांच्याकडून अधिकृत पत्र मिळाले नसले तरी त्यांचा निर्णय मान्य आहे. भारतीय फुटबॉलमध्ये त्यांच्या योगदानाबद्दल महासंघ आभारी आहे,’ असे त्यांनी म्हटले.

Web Title: Football coach Constantine resigns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.