Football: भारतीय संघ पुन्हा टॉप १०० मध्ये, फिफाकडून फुटबॉल क्रमवारी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 05:44 AM2023-06-30T05:44:08+5:302023-06-30T05:44:17+5:30

Football: फिफाने जाहीर केलेल्या ताज्या जागतिक क्रमवारीत भारतीय फुटबॉल संघाने पहिल्या शंभरमध्ये स्थान मिळवले आहे.  आंतरखंडीय चषक आणि एसएएफएफ चॅम्पियनशिपमधील पाच विजय आणि दोन ड्रॉमुळे भारताच्या खात्यात ४.२४ गुण जमा झाले.

Football: Indian team again in top 100, football rankings announced by FIFA | Football: भारतीय संघ पुन्हा टॉप १०० मध्ये, फिफाकडून फुटबॉल क्रमवारी जाहीर

Football: भारतीय संघ पुन्हा टॉप १०० मध्ये, फिफाकडून फुटबॉल क्रमवारी जाहीर

googlenewsNext

झुरिच - फिफाने जाहीर केलेल्या ताज्या जागतिक क्रमवारीत भारतीयफुटबॉल संघाने पहिल्या शंभरमध्ये स्थान मिळवले आहे.  आंतरखंडीय चषक आणि एसएएफएफ चॅम्पियनशिपमधील पाच विजय आणि दोन ड्रॉमुळे भारताच्या खात्यात ४.२४ गुण जमा झाले. याच कामगिरीच्या जोरावर भारत पुन्हा एकदा जागतिक क्रमवारीच्या अव्वल शंभर संघांमध्ये स्थान मिळविण्यात यशस्वी ठरला.  

भारतीय पुरुष राष्ट्रीय फुटबॉल संघाने लेबनॉन आणि न्यूझीलंडला मागे टाकत फिफा जागतिक क्रमवारीत १००व्या स्थानी झेप घेतली. भारतीय फुटबॉल संघाने १५ मार्च २०१८ पासून प्रथमच टॉप १०० मध्ये स्थान मिळवले आहे. फिफाने जाहीर केलेल्या पुरुष संघाच्या क्रमवारीनुसार, गतविजेता अर्जेंटिना क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. तर, फ्रान्स दुसऱ्या स्थानावर कायम आहे. त्यानंतर ब्राझील तिसऱ्या, इंग्लंड चौथ्या, बेल्जियम पाचव्या, क्रोएशिया सहाव्या, नेदरलँड सातव्या, इटली आठव्या, पोर्तुगाल नवव्या आणि स्पेन दहाव्या स्थानावर आहे.

Web Title: Football: Indian team again in top 100, football rankings announced by FIFA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.