Shocking : आफ्रिकेच्या खेळाडूचा कोरोनामुळे मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 11:57 AM2020-03-26T11:57:58+5:302020-03-26T11:58:48+5:30
कोरोना व्हायरसमुळे क्रीडा विश्वाला गुरुवारी मोठा धक्का बसला.
कोरोना व्हायरसमुळे क्रीडा विश्वाला गुरुवारी मोठा धक्का बसला. आफ्रिकेचा फुटबॉलपटू अब्दुलकादीर मोहमेद फराह याचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला. आफ्रिकन फुटबॉल महासंघ आणि सोमाई फुटबॉल महासंघानं या वृत्ताला दुजोरा दिला आहे. नॉर्थवेस्ट लंडन हॉस्पिटल मध्ये 59 वर्षीय फराहला प्राण गमवावे लागले.
सोमालियाचे युवा व क्रीडा मंत्री म्हमून फराह काम करत होते. 15 फेब्रुवारी 1961 मध्ये फराह यांचा बेलेड्वेयने येथे जन्म झाला. राजधानी मोगाडीशूपासून 342 किलोमीटर अंतरावर बेलड्वेयने आहे. फराह यांनी 1976मध्ये फुटबॉल खेळायला सुरुवात केली. त्यांनी राष्ट्रीय आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत प्रथम सहभाग घेतला.
त्यानंतर 1979मध्ये त्यांना विभागीय स्तरावर खेळण्याची संधी मिळाली. या संधीचं सोनं करताना त्यांनी 1980मध्ये बात्रुल्का फुटबॉल क्लबमध्ये प्रवेश केला. कोरोना व्हायरसमुळे प्राण गमवावे लागलेला फराह हा पहिलाच आफ्रिकन फुटबॉलपटू आहे. जगभरात कोरोनामुळे मृतांचा आकडा 20 हजाराच्या आसपास पोहोचला आहे.