Shocking : आसाममधील गॅस विहिरीच्या भीषण आगीत भारतीय फुटबॉलपटूनं गमावला जीव!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 01:09 PM2020-06-11T13:09:08+5:302020-06-11T13:09:44+5:30
दोन दिवसांपूर्वी आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील बगजानमधील ऑईल इंडिया लिमिटेडच्या गॅसच्या विहिरीला भीषण आग लागली होती.
दोन दिवसांपूर्वी आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील बगजानमधील ऑईल इंडिया लिमिटेडच्या गॅसच्या विहिरीला भीषण आग लागली होती. दोन आठवड्यांपासून येथील विहिरीतून सतत गॅसगळती सुरू होती, त्यानंतर मंगळवारी प्रचंड आग लागली. आगीमुळे सातत्याने विहिरीतून धूर बाहेर पडत होता. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी व कोणतेही नुकसान टाळण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ)ची टीम घटनास्थळी पोहोचली होती.
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, 'ऑईल इंडिया लिमिटेडच्या गॅसच्या विहिरीत इतका भीषण स्फोट झाला की, दोन किलोमीटरच्या अंतरावरून तो स्पष्ट दिसू शकत होता. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या आगीमुळे नजीकच्या परिसरातही नुकसान झाले. स्थानिकांना लगेच तेथून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. या आगीत आसामचा माजी फुटबॉलपटू दुर्लोव गोगोई याला जीव गमवावा लागला. तो अग्निशमन दलात कामाला होता आणि ही आग विझवण्यासाठी त्यानं जिद्दीनं प्रयत्न केलं.
Massive fire at #Baghjan oil field in #Assam's Tinsukia district. pic.twitter.com/yqyNhTVaD9
— Hemanta Kumar Nath (@hemantakrnath) June 9, 2020
बचाव कार्यात गोगोईला आपला जीव गमवावा लागला. त्यानं अनेक वर्ष आसाम फुटबॉल संघाचे प्रतिनिधित्व केले. शिवाय OL's फुटबॉल क्लबकडून तो 2003 ते 2012 या कालावधीत खेळला. इंडिनय सुपर लीगमधील नॉर्थ ईस्ट युनायटेड या क्लबनं ही दुःखद माहिती दिली. त्यांनी ट्विट केले की,''आसाम संघाचा माजी गोलकिपर दुर्लोव गोगोई याला या आगीत प्राण गमवावे लागले. बचावकार्य करताना त्याचा जीव गेला. ऑईल इंडिया लिमिटेडसाठी तो फायर फायटर म्हणून काम करायचा. त्याच्या आत्म्याला शांती लाभो.''
Former Assam State Team Goalkeeper Durlov Gogoi, passed away trying to contain the situation on ground. The ex-footballer served as a firefighter for Oil India Ltd. May his soul rest in peace and his family find the strength to deal with the incredible loss. 🙏🏻 pic.twitter.com/AhK2VbA8GO
— NorthEast United FC (@NEUtdFC) June 10, 2020
आगीत बचावकार्य करताना दोन फायरफायटर गायब झाले आणि त्यात गोगोई याचा समावेश होता. बुधवारी सायंकाळी या दोघांचे मृतदेह NDRFच्या टीमला आढळले.
IPL 2020 खेळवणारच, BCCIने कसली कंबर; सौरव गांगुलीनं राज्य संघटनांना पाठवले पत्र
भावा स्वतःच्या जीवावरच मी इतकी वर्ष खेळलो; रोहित शर्माच्या ट्विटला Yuvraj Singhचं उत्तर
क्वारंटाईन सेंटरमध्ये रंगली क्रिकेट मॅच; माजी मुख्यमंत्र्यांनी शेअर केलेला Video लाखोंनी पाहिला
#MissYouYuvi ट्रेंडवर युवराज सिंगची पत्नी हेझल किचची प्रतिक्रिया, म्हणते...
ऑस्ट्रेलिया दौरा सोपा नसेल; राहुल द्रविडनं कॅप्टन विराट कोहलीला सांगितला धोका