मेस्सी भारतीय असता अन् वर्ल्ड कप जिंकला असता तर...; सेहवागची पोस्ट ठरतेय चर्चेचा विषय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 07:57 PM2022-12-19T19:57:56+5:302022-12-19T19:58:03+5:30
भारतात अर्जेंटिनासह लिओनेल मेस्सीचे मोठ्या प्रमाणात चाहते आहेत.
अर्जेंटिनाने वर्ल्ड कप जिंकला अन् लिओनेल मेस्सीने ( Lionel Messi) निवृत्तीचा निर्णय मागे घेतला. मेस्सीने २०२२ च्या फिफा वर्ल्ड कप विजयानंतर आंतरराष्ट्रीय कर्तव्यातून निवृत्त होणार नसल्याचे स्पष्ट केले. अर्जेंटिनाने पेनल्टी शूट आऊटवर फ्रान्सवर ४-२ ( ३-३) असा विजय मिळवला आणि मेस्सीने कारकिर्दीत प्रथमच वर्ल्ड कप जिंकला.
फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धा इतिहासात कदाचितच अंतिम सामना एवढा थरारक झाला असेल. ८०व्या मिनिटाला २- ० अशी आघाडी घेणाऱ्या अर्जेंटिनाला गतविजेत्या फ्रान्सने पेनल्टी शूटआऊटपर्यंत नेले... कायलिन एमबाप्पेने १ मिनिट ३७ सेकंदात दोन गोल केले अन् ९० मिनिटांच्या खेळात २-२ अशी बरोबरी राहिली. ३० मिनिटांच्या अतिरिक्त खेळात मेस्सीने १०८व्या मिनिटाला अर्जेंटिनाला ३-२ अशी आघाडी मिळवून दिली, पण एमबाप्पे हार मानणारा नव्हता त्याने ११८व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करून हॅटट्रिक पूर्ण केली आणि सामना ३-३ असा बरोबरीत सोडवला.
भारतात अर्जेंटिनासह लिओनेल मेस्सीचे मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. सोशल मीडियावर देखील अर्जेंटिनाच्या विजयानंतर चाहत्यांनी कौतुकांचा वर्षाव केला होता. याचदरम्यान भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे. मेस्सीचा सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत होता. हा फोटो घेऊन सेहवागने फेसबुकवर पोस्ट केली आहे.
दरम्यान, फिफा विश्वचषक २०२२ च्या अंतिम सामन्यात विजेता झालेल्या अर्जेंटिना संघाला ३४७ कोटी रुपये बक्षिस म्हणून देण्यात आले आहे. तर उपविजेत्या फ्रान्सच्या संघला २४८ कोटी रुपये देण्यात आले आहे. तिसरं स्थान पटकावलेल्या क्रोएशियाला २२३ कोटी रुपये आणि चौथ्या स्थानावर असलेल्या मोरक्को २०६ कोटी रुपये बक्षिस म्हणून देण्यात आले.
पेनल्टीचा थरार...
कायलिन एमबाप्पे - 1-0 ( फ्रान्स )
लिओनेल मेस्सी - 1-1 ( अर्जेंटीना)
किंग्स्ली कोमन ( संधी गमावली ) - 1-1 ( फ्रान्स)
पॉलो डिबाला - 1-1 ( अर्जेंटिना)
आरेलोना टी चौमेनी ( संधी गमावली ) - 1-2 ( फ्रान्स)
लिएंड्रो पेरेडेस - 3-1 ( अर्जेंटीना)
रँडल कोलो मौनी - 2-3 ( फ्रान्स)
गोंझालो मॉटेई - 4-2 ( अर्जेंटीना)
18 कॅरेट सोन्याचा वापर-
फिफा वर्ल्डकपच्या ओरिजनल ट्रॉफीचं वजन जवळपास 6.175 किलो इतकं आहे आणि ती बनवण्यासाठी 18 कॅरेट सोन्याचा वापर करण्यात आला आहे. ट्रॉफीची लांबी 36.8 सेंटीमीटर आणि व्यास 13 सेंटीमीटर इतका आहे. ट्रॉफीच्या बेसवर मॅलाकाइट स्टोनचे दोन स्तर आवरण देण्यात आलं आहे. 1994 साली या ट्रॉफीमध्ये थोडा बदल करण्यात आला आणि विजेत्या संघाचं नाव लिहिण्यासाठी ट्रॉफीच्या खाली एक प्लेट लावण्यात आली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"