माजी विश्वविजेत्यांची आत्मविश्वासू ‘री एन्ट्री’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 02:21 AM2018-09-08T02:21:59+5:302018-09-08T02:22:07+5:30
रशिया विश्वचषकात मानहानीकारक एक्झिट घेतलेला जर्मनीचा फुटबॉल संघ गुरूवारी रात्री पहिल्यांदाच आंतरराष्टÑीय मैदानावर उतरला. सामना स्वत:च्याच देशात असला तरी समोर विश्वचषक विजेता बलाढ्य फ्रान्सचा संघ होता.
- चिन्मय काळे
मुंबई : रशिया विश्वचषकात मानहानीकारक एक्झिट घेतलेला जर्मनीचा फुटबॉल संघ गुरूवारी रात्री पहिल्यांदाच आंतरराष्टÑीय मैदानावर उतरला. सामना स्वत:च्याच देशात असला तरी समोर विश्वचषक विजेता बलाढ्य फ्रान्सचा संघ होता. पण रशियाचे कुठलेही दडपण न बाळगता फ्रान्सला गोलशून्य रोखण्यात मिळवलेले यश जर्मनीची जुन्या परंपरेला साजेशा खेळाची चुणूक देऊन गेले. ही जर्मन फुटबॉल संघासाठी आत्मविश्वास वाढविणारी ‘री एन्ट्री’ म्हणता येईल.
जर्मनी हे फुटबॉल विश्वातील ठळक नाव. चार वेळा विश्वचषक स्वत:च्या नावावर कोरलेल्या जर्मन फुटबॉल संघाला आंतरराष्टÑीय स्तरावरील मानहानीकारक ‘एक्झिट’
यंदा रशियात झालेला फुटबॉल विश्वचषक स्वीकारावी लागली. गतविजेते साखळीतच गारद झाले होते. यामुळे विश्वचषकानंतर जर्मन फुटबॉल संघाबाबत आंतरराष्टÑीय फुटबॉल विश्वात नानावीध चर्चा सुरू झाल्या होत्या. संघात परिवर्तनाचे वारे वाहू लागले. संघाची रणनिती व एकूणच संघाचा मैदानावरील वावर पूर्णपणे बदलेल, असे प्रशिक्षक जोकिम लोव्ह यांनाही स्पष्ट करावे लागले. या सर्व निर्णयांची ‘लिटमस टेस्ट’ युरोपियन राष्टÑांच्या पहिल्यांदाच होणाºया ‘लीग’ स्पर्धेच्या शुभारंभाच्या सामन्यात होती. कारण हा सामना फ्रान्सविरुद्ध होता.
जर्मनीतील म्युनिकच्या आकर्षक स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात फ्रान्सने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील संघच मैदानात उतरवला होता. मबाप्पे, पोगबा, जिरुड, ग्रीन्झमन यासारख्या सुपरस्टार्सचा त्यात समावेश होता. विश्वचषकात मोक्याच्या संधी घालवलेल्या अनुभवी मारिओ गोमेझ, मॅट्स ह्युमेल्स, ज्युलिअन ड्रॅक्सलर व सामि खेदीरा यांना जर्मनीने या सामन्यापासून दूर ठेवले. पण मार्को रोस, थॉमस मूलर, टोनी क्रूस, जोशा किमिच यांच्या साथीला लिआॅन गोरेत्झ्काला संधी देण्यात आली. यापैकी गोरेत्झ्का वगळल्यास उर्वरित तोच विश्वचषकातीलच पराभूत संघ होता. त्यामुळे जर्मन फुटबॉल चाहत्यांच्या मनात धाकधूक होती.
सामान्यातील पहिल्या २० मिनीटात फ्रान्सने अपेक्षेप्रमाणे आक्रमक खेळ केला. पण विश्वचषकातील चुकांवर पांघरुन घालण्यात अनुभवी जेरोम बोएतॅन्ग व अॅन्टोनिओ रुडीगर यांना यश आले. कर्णधार मॅन्युएल न्युअर यानेदेखील जुन्या खेळाला साजेसे गोलरक्षण केले. दुसरा हाफमध्ये जर्मनीने माजी विश्वविजेते असल्याची चुणूक दिली. विश्वचषक स्पर्धेत जर्मनीच्या संघात समन्वयाचा अभाव होता. मध्यम फळीकडून आघाडीसाठी बॉलच येत नव्हता. या सामन्यात मात्र मूलर, क्रूस, नवोदीत टीमो वेर्नर यांनी सातत्याने व्युहरचनेत बदल करीत आक्रमणांची सरबत्ती केली. पण फ्रान्सच्या नवोदीत अल्फान्सो ऐरोला या गोलरक्षकानेसुद्धा खेळाची चुणूक दाखवत आक्रमणे परतवून लावली.
दोन्ही अनुभवी संघांकडून अत्यंत कमी झालेले फाऊल्स व त्यामुळेच अत्यल्प अशा ‘स्पॉट किक’मध्ये हा सामना रंगला. मात्र दुसºया हाफमध्ये जर्मन संघाकडून झालेली आक्रमणे व फ्रान्ससमोर केलेला बचाव हाच या सामान्यातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला.