' हे ' खेळाडू खेळणार चौथा फुटबॉल विश्वचषक... पाहा त्यांचे सर्वोत्तम गोल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2018 03:54 PM2018-06-06T15:54:15+5:302018-06-06T15:54:15+5:30
असेही काही खेळाडू आहेत की ते यंदाच्या चौथ्यांदा विश्वचषक स्पर्धेत खेळणार आहेत. त्याचबरोबर या खेळाडूंचा सर्वोत्तम गोलही तुम्हाला पाहता येईल...
मॉस्को : सध्याच्या घडीला फुटबॉल विश्वचषकाचा कैफ चढायला सुरुवात झाली आहे. फुटबॉलमध्ये फिटनेसचा कस लागतो. त्यामुळे जास्त काळ हा खेळ आंतरराषट्रीय स्तरावर खेळणे सोपे नसते. पण असेही काही खेळाडू आहेत की ते यंदाच्या चौथ्यांदा विश्वचषक स्पर्धेत खेळणार आहेत. त्याचबरोबर या खेळाडूंचा सर्वोत्तम गोलही तुम्हाला पाहता येईल...
1. लिओनेल मेस्सी (अर्जेंटीना)
सध्याच्या घडीला फुटबॉल विश्वातील अव्वल खेळाडूंपैकी एक आहे तो लिओनेल मेस्सी. अर्जेंटीनासाठी मेस्सीने 2005मध्ये पदार्पण केले आणि त्यानंतर लगेचच 2006 साली झालेल्या विश्वचषकात त्याला संधी मिळाली. आता हा मेस्सीचा चौथा आणि अखेरचा विश्वचषक असल्याचे म्हटले जात आहे.
2. सर्गिओ रामोस (स्पेन )
वयाच्या अठराव्या वर्षापासून रामोस हा आंतरराष्ट्रीय स्तरावर फुटबॉल खेळत आहे. आता त्याचे वय 32 असून तो त्याचा हा अखेरचा विश्वचषक असेल. 2010 साली जेव्हा स्पेनने विश्चचषक जिंकला होता तेव्हा त्यामध्ये रामोसला महत्त्वाचा वाटा होता.
3. गुइलेर्मो ओचोमा (मेक्सिको )
मेक्सिकोची भिंत म्हणून त्यांचा गोलरक्षक गुइलेर्मो ओचोमा हा प्रसिद्ध आहे. आतापर्यंत त्याने केलेल्या गोलरक्षणाचा मेक्सिकोला चांगलाच फायदा झाला आहे. पण हा गुइलेर्मोचा चौथा आणि अखेरचा विश्वचषक असेल.
4. ख्रिस्तियानो रोनाल्डो (पोर्तुगाल)
सध्याच्या घडीला सर्वात चाणाक्ष फुटबॉलपटू, अशी ख्रिस्तियानो रोनाल्डोची ओळख आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर रोनाल्डो गेल्या 15 वर्षांपासून आहे. सध्या रोनाल्डोचा हा चौथा आणि अखेरचा विश्वचषक असल्यामुळे त्याची जादू पाहण्यासाठी चाहते आसूसलेले असतील.
5. आंद्रेस इनिएस्टा (स्पेन)
स्पेनचा सर्वात अनुभवी फुटबॉलपटू म्हणजे आंद्रेस इनिएस्टा. आतापर्यंत स्पेनसाठी त्याने नेत्रदीपक कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे. यंदाचा आंद्रेसचा हा अखेरचा विश्वचषक असणार आहे. नेदरलँड्सविरुद्धच्या अंतिम फेरीत स्पेनने जो विजय मिळवला होता त्यामध्ये आंद्रेसचा सिंहाचा वाटा होता.