France vs Croatia, WC Final : क्रोएशियाच्या सर्वोत्तम संघात प्रशिक्षक डॅलिच
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 11:00 PM2018-07-15T23:00:37+5:302018-07-15T23:00:58+5:30
१९९८ च्या विश्वचषकावेळी संघर्षातून देशाची निर्मिती होऊन क्रोएशियाला फक्त सात वर्षे झाली होती. तरीहीसुद्धा संघाने स्वत:ला विश्वचषकात केवळ पात्रच केले नाही तर संघ जर्मनीसारख्या बलाढ्य संघाला नमवून उपांत्य फेरीत पोहोचला. त्या संघात झ्लॅटको डॅलिच हे युवा खेळाडू होते.
मुंबई : १९९८ चा विश्वचषक जसा फ्रान्ससाठी अविस्मरणीय होता तसाच तो क्रोएशियासाठीसुद्धा होता. त्यावेळी उपांत्य लढतीपर्यंत पोहोचलेल्या क्रोएशियाच्या संघात असलेले झ्लॅटको डॅलिच हे क्रोएशियाच्या संघाचे प्रशिक्षक आहेत.
१९९८ च्या विश्वचषकावेळी संघर्षातून देशाची निर्मिती होऊन क्रोएशियाला फक्त सात वर्षे झाली होती. तरीहीसुद्धा संघाने स्वत:ला विश्वचषकात केवळ पात्रच केले नाही तर संघ जर्मनीसारख्या बलाढ्य संघाला नमवून उपांत्य फेरीत पोहोचला. त्या संघात झ्लॅटको डॅलिच हे युवा खेळाडू होते. क्रोएशियाची त्या स्पर्धेतील कामगिरी जशी उल्लेखनीय होती, तशीच ती या स्पर्धेतही ठरली. यंदा डॅलिच हे संघाचे प्रशिक्षक होते.
मुख्य म्हणजे १९९८ मध्ये फ्रान्सचे क्रोएशियाचा उपांत्य फेरीत पराभव केला. यंदा अंतिम फेरीत. पण शांत राहून संघाची कुटुंब म्हणून बांधणी करण्याचे श्रेय डॅलिच यांना जाते. त्यातूनच संघ अंतिम फेरीपर्यंत पोहोचला.