France vs Croatia, WC Final Live: चुकीला माफी नाही.... क्रोएशियाचा आत्मघात
By स्वदेश घाणेकर | Published: July 15, 2018 09:28 PM2018-07-15T21:28:43+5:302018-07-15T21:29:23+5:30
पेरिसिचचा अप्रतिम गोल वगळता क्रोएशियाच्या खेळात फार वैशिष्ट जाणवले नाही. त्यांनी चुका केल्या नसत्या तर पहिल्या सत्रातील निकाल क्रोएशियाच्या बाजूने 1-0 असा असता. येथे चुकीला माफी नाही... हेच पुन्हा जाणवले.
- स्वदेश घाणेकर: दडपणात क्रोएशियाचा खेळ अधिक बहरतो, याची प्रचिती संपूर्ण स्पर्धेत आली आणि फ्रान्सविरूद्धच्या अंतिम सामन्यातही त्यांनी तसाच खेळ केला. विश्वचषक स्पर्धेची पहिली अंतिम लढत खेळणा-या क्रोएशियाच्या खेळाडूंनी माजी विजेत्या फ्रान्सला घाम गाळण्यास भाग पाडले. पहिल्या 15 मिनिटांत त्यांच्याकडून गोल गोल करण्याचे दोन सुरेख प्रयत्न झाले. पेरिसिच आणि मँडझुकीच यांनी फ्रान्सच्या बचावपटूंची कसोटी पाहिली पण फ्रान्स डिफेंडर उमटीटी आणि पव्हार्ड यांनी पेनल्टी क्षेत्रात चोख कामगिरी बजावताना क्रोएशियाला यश मिळू दिले नाही. मात्र 18 व्या मिनिटाच्या त्या गोलने क्रोएशियाला मोठा धक्का दिला. आक्रमणाची धुरा वाहणा-या मँडझुकीचच्या डोक्याला लागून चेंडू क्रोएशियाच्याच गोलजाळीत विसावला. या गोलनंतर क्रोएशियाने पुनरागमन केले, परंतु पुन्हा एकदा त्यांना चुकीचा फटका बसला. अँटोइने ग्रिझमनने पेनल्टी स्पॉट किकवर गोल करत फ्रान्सला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली.
Key stats:
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) July 15, 2018
👉 We've not had a #WorldCupFinal with three goals in the first half since 1974
👉 It's the first #WorldCupFinal with three goals since 1998
So yeah, goals! #FRACRO // #WorldCupFinalpic.twitter.com/DBfXIJQfSR
आश्चर्यकारक निकाल नोंदवून अंतिम फेरीपर्यंत धडकलेल्या क्रोएशियाचा खेळ विस्कळीत जाणवला. त्याचा फ्रान्सलाच फायदा झाला. चेंडूवर सर्वाधिक ताबा राखूनही क्रोएशियाला वर्चस्व गाजवता आले नाही. मँडझुकीचच्या चुका त्यांना चांगल्याच महागात पडल्या. दोन्ही संघांनी यावेळी फॉरमेशनमध्ये 4-2-3-1 असा बदल करताना आक्रमणावर भर दिला. चेंडूवर 61 टक्के ताबा क्रोएशियाकडे होता आणि त्यांच्याकडून गोल करण्याचे 7 प्रयत्न झाले. पण, फ्रान्सने आक्रमणाबरोबर बचावातही उजवी कामगिरी केली. पेरिसिचचा अप्रतिम गोल वगळता क्रोएशियाच्या खेळात फार वैशिष्ट जाणवले नाही. त्यांनी चुका केल्या नसत्या तर पहिल्या सत्रातील निकाल क्रोएशियाच्या बाजूने 1-0 असा असता. येथे चुकीला माफी नाही... हेच पुन्हा जाणवले.
Annnnnnd breathe.
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) July 15, 2018
That was pretty eventful! #FRACRO // #WorldCupFinalpic.twitter.com/tH7SPTBaQh