Poulami Adhikari : देशासाठी खेळली फुटबॉल, पण करावं लागतंय फूड डिलिव्हरीचं काम; कधी-कधी 200 रुपयेही मिळत नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 01:27 PM2023-01-13T13:27:34+5:302023-01-13T15:03:24+5:30

Poulami Adhikari : राष्ट्रीय फुटबॉल संघाची जर्सी परिधान करून पालोमी अधिकारी फूड डिलीव्हरीचे काम करत आहे.

From being a national level footballer to food delivery agent: Journey of Kolkata-based Poulami Adhikari | Poulami Adhikari : देशासाठी खेळली फुटबॉल, पण करावं लागतंय फूड डिलिव्हरीचं काम; कधी-कधी 200 रुपयेही मिळत नाहीत

Poulami Adhikari : देशासाठी खेळली फुटबॉल, पण करावं लागतंय फूड डिलिव्हरीचं काम; कधी-कधी 200 रुपयेही मिळत नाहीत

googlenewsNext

नवी दिल्ली : फुटबॉल हा अतिशय लोकप्रिय खेळ आहे. विदेशी फुटबॉल खेळाडू या खेळातून कोट्यवधी रुपये कमावतात. भारतातही फुटबॉलची क्रेझ हळूहळू वाढत आहे. भारतातील काही फुटबॉल खेळाडू करोडोंची कमाई करत आहेत, पण काही खेळाडू असे आहेत, जे रोजीरोटीसाठी मजूर म्हणून काम करत आहेत. अशीच एक राष्ट्रीय फुटबॉलपटू आहे, तिला फूड डिलिव्हरीचे काम करावे लागत आहे. राष्ट्रीय फुटबॉल संघाची जर्सी परिधान करून पालोमी अधिकारी फूड डिलीव्हरीचे काम करत आहे.

पालोमी अधिकारी हिने एक व्यावसायिक फुटबॉलपटू बनण्याचे स्वप्न पाहिले होते. तिला आपल्या कुटुंबासाठी भारतीय संघात नियमित खेळायचे होते. यामुळे आपल्या कुटुंबाला गरिबीतून काही प्रमाणात दिलासा देऊ शकेल, अशी आशा पालोमी अधिकारीला होती, पण गुडघ्याच्या दुखापतीने सात वर्षांपूर्वी जगातील विविध देशांमध्ये खेळण्याचे तिचे स्वप्न भंगले.

दुखापतीतून सावरल्यानंतर पालोमी अधिकारी मैदानात परतण्याच्या तयारीत होती, पण त्याच दरम्यान कुटुंबाची आर्थिक कोंडी तिच्यासमोर आली. शिवरामपूर, बेहाला येथील श्रीगुरु संघ आश्रमाच्या पलोमीने बालपणीच आई गमावली होती. तिच्या मावशीने तिला आपल्या मुलीप्रमाणे वाढवले. पण आता या कुटुंबासाठी पालोमी अधिकारीने फुटबॉलचे बूट काढून आता फूड डिलीव्हरीचे काम हाती आहे.

भारतासाठी अंडर-16 आणि अंडर-19 खेळणारी  पालोमी अधिकारी एक शानदार डिफेंडर आहे. पण, आता जीवन जगण्यासाठी संघर्ष करत आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत इतरांची भूक भागवण्यासाठी ती धावत असते. एखाद्या दिवशी तिची कमाई 400 रुपये होते तर कधी तिला 200 रुपयेही मिळत नाहीत. मात्र, बंगालच्या फुटबॉल नियामक मंडळाच्या नेत्यांना या स्टार खेळाडूच्या संघर्षाबद्दल काहीच माहिती नाही.

पालोमी अधिकारीच्या आयुष्यातील हा संघर्ष काही नवीन नाही. लहान वयात आई गमावलेल्या मुलीला फक्त फुटबॉलची आवड होती. त्याच्यासोबत शेजारची मुलं होती, त्यामुळे त्याची चेष्टा केली जात होती. पण या मुलीने हार मानली नाही. सर्व अडचणींवर मात करून चार वर्षे दिल्लीत क्लब फुटबॉल खेळली. पण दोन वेळच्या रोजीरोटीच्या नादात तिचा फुटबॉल हिरावून घेतला जाईल हे तिला माहीत नव्हते.

नुकताच पालोमी अधिकारीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पालोमी अधिकारी म्हणते की, ती राष्ट्रीय संघासाठी फुटबॉल खेळली आहे. मात्र, कुटुंबाच्या कमी उत्पन्नामुळे तिला फुटबॉल सोडून फूड डिलिव्हरी करण्याचे काम करावे लागत आहे. दरम्यान, ती जर्मनी, इंग्लंड, अमेरिका, श्रीलंका, स्कॉटलंड इत्यादी देशांतही खेळली आहे. 

Web Title: From being a national level footballer to food delivery agent: Journey of Kolkata-based Poulami Adhikari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.