Corona Virus : जन्मगाव अन् कर्मभूमीचे ऋण फेडले, स्टार खेळाडूची कोट्यवधींची मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 04:15 PM2020-04-23T16:15:49+5:302020-04-23T16:16:54+5:30
जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 26 लाख 54,209 वर गेली आहे. त्यापैकी 7 लाख 27,886 जणं बरे झाले असून मृतांचा आकडा 1 लाख 85,062 वर गेला आहे.
जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 26 लाख 54,209 वर गेली आहे. त्यापैकी 7 लाख 27,886 जणं बरे झाले असून मृतांचा आकडा 1 लाख 85,062 वर गेला आहे. कोरोनाच्या संकटाशी मुकाबला करण्यासाठी अनेक खेळाडू पुढे आले आहेत. त्यांनी आपापल्या परिनं सरकारला आर्थिक सहाय्य केलं आहे. वेल्स संघाचा स्टार फुटबॉलपटू गॅरेथ बेल यानेही पुढाकार घेत त्याच्या जन्मगावासाठी 5 लाख पाऊंड म्हणजेच 4 कोटी 68 लाख 53,778 रुपयांची मदत केली आहे. इतकेच नाही, तर कर्मभूमी असलेल्या स्पेनसाठीही त्यानं 5 लाख पाऊंडचं जान केलं आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सीनंतर इतकी मोठी आर्थिक मदत करणारा बेल हा तिसरा फुटबॉलपटू ठरला आहे.
स्पॅनिश लीग ला लिगामध्ये बेल रेयाल माद्रिद क्लबचे प्रतिनिधित्व करतो. वेल्समधील NHS साठी त्यानं 5 लाख पाऊंडची मदत केली आहे. ''NHS च्या सर्वा आरोग्य सेवकांचे मी आभार मानतो. कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी ते अथक परिश्रम घेत आहेत आणि त्यांनी अनेक त्यागही केले आहेत,'' असे बेल म्हणाला.
''वेल्समधील युनिव्हर्सिटी हॉस्पिटलचं माझ्या हृदयात खास स्थान आहे. याच हॉस्पिटलमध्ये मी जन्मलो आणि त्यांनी माझ्या कुटुंबीयांना, मित्रपरिवाराला खुप सहकार्य केले. त्यामुळे या कठीण काळात मला या हॉस्पिटलला मदत करायची आहे. असंच चांगलं काम करत राहा,'' असा मॅसेज बेलने दिला आहे.
Our @Health_Charity the official charity of @cv_uhb would like to thank Wales and Real Madrid football legend, Gareth Bale and his wife Emma for their huge £500,000 donation to the University Hospital of Wales. @GarethBale11
— Cardiff & Vale UHB (@CV_UHB) April 22, 2020
Read more here: https://t.co/NPkxZ8ZKzxpic.twitter.com/E9NQnTJRMQ
अन्य महत्त्वाच्या बातम्या
Arnab Goswami यांच्या समर्थनात कुस्तीपटू बबिता फोगाट आखाड्यात; म्हणाली...
पाकिस्तानी फलंदाज देशासाठी खेळतात, भारतीय स्वतःसाठी; पाकचा माजी कर्णधार बरळला
मोठा निर्णय : 'युनिव्हर्स बॉस' Chris Gayleच्या मदतीला किंग्स इलेव्हन पंजाब धावला
'Sex Video'मुळे महिला खेळाडूचं आयुष्य झालं होतं उद्ध्वस्त; तीन दिवस घरातच होता मृतदेह
CSKनं MS Dhoniची निवड केल्यानं मोठा धक्का बसला; दिनेश कार्तिकनं व्यक्त केली खंत
Video : टीम इंडियाच्या कर्णधाराचं 'Magic'; बघा तुम्हाला जमतंय का?
'यंदा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप होणं अवघड, त्यामुळे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये IPL 2020 खेळवा'