नौटंकीबाज नेयमार; विश्वचषक स्पर्धेत 'ओव्हर अॅक्टींग' केल्याची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 01:02 PM2018-07-30T13:02:54+5:302018-07-30T13:04:34+5:30
रशियात नुकत्याच पार पडलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत माजी विजेत्या ब्राझिलच्या खेळापेक्षा नेयमारची अॅक्टींग चर्चेचा विषय ठरला.
मुंबई - रशियात नुकत्याच पार पडलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत माजी विजेत्या ब्राझिलच्या खेळापेक्षा नेयमारची अॅक्टींग चर्चेचा विषय ठरला. पायाला लागल्यानंतर त्याचे त्या मैदानावरील लोळण्याच्या कृतीची सोशल मीडियावर चांगलीच थट्टा उडवली गेली, तर अनेकांनी त्याच्यावर टीका केली. अखेर नौटंकीबाज नेयमारने विश्वचषक स्पर्धेत आपण ओव्हर अॅक्टींग केल्याची कबुली दिली. ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करून ही कबुली दिली. नेयमारने फिफा विश्वचषक स्पर्धेत दोन गोल केले. उपांत्यपूर्व फेरीत त्यांना बेल्जियमकडून पराभव पत्करावा लागला.
Eu caí. Mas só quem cai, pode se levantar. Você pode continuar jogando pedra. Ou pode jogar essas pedras fora e me ajudar a ficar de pé. Porque quando eu fico de pé, parça, o Brasil inteiro levanta comigo.#umnovohomemtododia
— Neymar Jr (@neymarjr) July 30, 2018
Assista o vídeo na íntegra: https://t.co/GKvLfqOIbBpic.twitter.com/3EFBx68zL8
नेयमार म्हणाला की,'मी घडलेली घटना अधिक रंजक करण्यासाठी प्रयत्नशील असतो असे तुम्हाला वाटत असेल, तर हो मी कधी कधी असे करतो. पण, मला मैदानावर अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.'