Football: मुंबई, ठाण्यात फुटबॉलची वाढती क्रेझ !
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 03:14 PM2023-06-26T15:14:27+5:302023-06-26T15:14:48+5:30
Football: आयपीएलचा थरार संपला आ आणि त्यानंतर जागति कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्याची चुरसही संपली. यानंतर सुरू झाली ती फुटबॉलची क्रेझ
- रोहित नाईक
(वरिष्ठ उपसंपादक)
आयपीएलचा थरार संपला आ आणि त्यानंतर जागति कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्याची चुरसही संपली. यानंतर सुरू झाली ती फुटबॉलची क्रेझ याला कारणही तसेच म्हणजे, डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यातील भारताच्या निराशाजनक कामगिरीनंतर भारतीयांना जल्लोषाची संधी दिली ती फुटबॉल संघाने लेबनॉन संघाला अंतिम फेरीत नमवून भारताने इंटरकॉन्टिनेंटल कप पटकाविला. यानंतर सॅफ अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तानचा ४-० असा धुव्वा उडविला आणि सुरू झाली फुटबॉलची चर्चा.
पूर्वी मुंबईच्या गल्लीबोळांत फुटबॉल खेळला जायचा, हे आजच्या पिढीला सांगितले तर त्यांना खरे वाटणार नाही. २०१७ मध्ये भारतात झालेला १७ वर्षांखालील विश्वचषक भारतीय फुटबॉलसाठी मैलाचा दगड ठरला. फुटबॉलची जागतिक संस्था असलेल्या फिफाची कोणतीही स्पर्धा भारतात पहिल्यांदाच पार पडली होती. मुंबईत कुलाबा येथील कुपरेज स्टेडियम म्हणजे फुटबॉलप्रेमींचे सर्वांत आवडते स्थळ.
एमएसएसएची मोलाची भूमिका
- मुंबईमध्ये शालेय फुटबॉल स्पर्धा मुंबई शालेय क्रीडा संघटनेच्या (एमएसएसए) वतीने रंगतात. यामध्ये सुमारे ४०० हून अधिक शालेय संघ सहभागी होतात.
- शालेय स्पर्धा गाजविणाया उदयोन्मुख खेळाडूंना एमएफएच्या विशेष शिबिरांमार्फत प्रशिक्षणही मिळते आणि त्यांच्या स्पर्धात्मक फुटबॉलचा पाया भक्कम केला जातो.
नोकरीच्या संधी
एमएफएच्या एलिट गटात बलाढ्य संघांचा समावेश असतो. यामध्ये प्रामुख्याने कॉर्पोरेट्स आणि सरकारी संघाचा सहभाग असतो, त्यामुळेच गुणवान खेळाडूंना फुटबॉलच्या माधमातून नोकरीची संधीही असते.
स्पर्धांचा धडाका
मुंबई फुटबॉल असोसिएशनच्या (एमएफए) वतीने मुंबईमध्ये फुटबॉल स्पर्धाचे आयोजन केले होते. सुमारे ३०० हून अधिक क्लब्स संघ 'एमएफए शी संलग्न आहेत. थर्ड डिव्हिजन, सेकंड डिव्हिजन, फर्स्ट डिव्हिजन, कॉर्पोरेट लीग, वुमन्स सुपर लीग, सुपर कॉर्पोरेट लीग, सुपर प्रीमियर लीग आदी स्पर्धा रंगतात.