आईसलँडवर मोठ्या विजयाची अर्जेंटिनाला आशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 05:37 IST2018-06-16T05:37:40+5:302018-06-16T05:37:40+5:30
फुटबॉलचा सुपरस्टार लियोनेल मेस्सीचा अर्जेंटिना विश्वचषक पदार्पण करणाऱ्या आइसलँडविरुद्ध मोठ्या विजयाच्या निर्धाराने उतरेल.

आईसलँडवर मोठ्या विजयाची अर्जेंटिनाला आशा
मॉस्को : फुटबॉलचा सुपरस्टार लियोनेल मेस्सीचा अर्जेंटिना विश्वचषक पदार्पण करणाऱ्या आइसलँडविरुद्ध मोठ्या विजयाच्या निर्धाराने उतरेल.
मेस्सी आपल्या देशाला अद्याप विश्वचषक जिंकून देऊ शकला नाही. गत उपविजेता हा संघ यंदा चॅम्पियन बनण्याच्या इराद्याने येथे दाखल झाला आहे. ड गटात सर्वच संघ तुल्यबळ वाटतात. आइसलँड तेवढा कमकुवत मानला जातो.
अर्जेंटिना पात्रता फेरीत प्रभावी दिसलाच नाही. एकवेळ तर विश्वचषक खेळणार की नाही, अशी शंका उपस्थित झाली होती. स्पेन आणि नायजेरियाविरुद्ध गमविलेल्या सामन्यात मेस्सी खेळला नव्हता. मेस्सीला २०१४ च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात जर्मनीकडून पराभव होताच स्वप्नपूर्ती करता आली नाही. त्याची भरपावती यंदा होऊ शकते.