अफगाणिस्तानविरुद्ध भारताला विजयाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 04:17 AM2019-11-14T04:17:00+5:302019-11-14T04:17:05+5:30

फिफा विश्वचषक फुटबॉल पात्रता फेरीत महत्वाच्या सामन्यात भारतीय संघ गुरुवारी अफगाणिस्तानविरुद्ध शानदार विजय नोंदविण्याच्या प्रतिक्षेत आहे.

India needs victory against Afghanistan | अफगाणिस्तानविरुद्ध भारताला विजयाची गरज

अफगाणिस्तानविरुद्ध भारताला विजयाची गरज

googlenewsNext

दुशाम्बे (ताजिकिस्तान): फिफा विश्वचषक फुटबॉल पात्रता फेरीत महत्वाच्या सामन्यात भारतीय संघ गुरुवारी अफगाणिस्तानविरुद्ध शानदार विजय नोंदविण्याच्या प्रतिक्षेत आहे. ई गटात समावेश असलेल्या भारताकडे केवळ दोन गुण असून गुणतालिकेत चौथ्या स्थानी असलेल्या संघाला अद्याप विजयाची चव चाखता आलेली नाही. पुढील फेरी गाठण्यासाठी संघाला विजयाची गरज असेल. पराभव झाला तर मात्र पुढील फेरीची आशा संपुष्टात येईल. युद्धजन्य अफगाणने मायदेशातील सामन्यासाठी ताजाकिस्तानच्या दुशाम्बे शहराची निवड केली हे विशेष.
भारताने पात्रता फेरीची सुरुवात ओमानविरुद्ध मिळालेल्या १-२ या पराभवासह केली होती. त्यानंतर सप्टेंबरमध्ये दोहा येथे आशियाई चॅम्पियन कतारला गोलशून्यने बरोबरीत रोखले. दोन्ही सामन्यातील कामगिरीमुळे भारतीय संघाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या, तथापि १५ आॅक्टोबर रोजी कोलकाता येथे शेजारी बांगला देशविरुद्धचा सामना १-१ असा बरोबरीत सुटताच उत्साहावर विरजण पडले. प्रतिस्पर्धी संघाकडून आदिलखान याने ८८ व्या मिनिटाला हेडरवर गोल नोंदवून सॉल्टलेकवर उपस्थित भारतीय चाहत्यांच्या उत्साहावर पाणी फेरले होते. अफगाण संघ फिफा क्रमवारीत १४९ व्या तर भारत १०६ व्या स्थानावर आहे. अफगाणिस्तानने गटात एक विजय आणि दोन पराभवांसह तिसरे स्थान पटकावले.
भारतीय प्रशिक्षक इगोर स्टीमक कुठल्याही स्थितीत सामना गमविण्याच्या विचारात नाहीत. स्टीमक म्हणाले, ‘संघाने कामगिरीच्या बळावर कुठल्याही स्थितीत येथे विजय मिळवायलाच हवा.’ हा सामना अत्यंत थंड वातावरणात कृत्रिम टर्फवर खेळला जाणार असल्याने स्टीमक यांच्या अडचणीत भर पडली. भारतीय खेळाडू अशा परिस्थितीश्ी एकरुप नाहीत. येथील तापमान शून्यापर्यंत असते. (वृत्तसंस्था)
>रेकॉर्ड भारताच्या बाजूने...
रेकॉर्डवर नजर टाकल्यास भारताचे पारडे अफगाणिस्तावर जड आहे. उभय संघ ८ वेळा परस्परांविरुद्ध खेळले. त्यातील ६ सामने भारताने जिंकले. एक सामना अफगाणिस्तानने जिंकला तर एक सामना अनिर्णीत राहीला होता. उभय संघ २०१३ च्या सॅफ गेममध्ये अखेरचा सामना खेळले. त्यावेळी अफगाणिस्तान संघ २-० ने विजयी ठरला होता. अफगाण संघाने मागच्या गटातील सामन्यात बांगला देशवर १-० ने मात केली होती. तथापि ओमानकडून त्यांचा ०-३ ने आणि कतारकडून ०-६ ने पराभव झाला होता. अफगाणिस्तानकडून सर्वाधिक ४८ आंतरराष्टÑीय सामने खेळणारा हारुन आमिरी हा भारतीय खेळाडूंसाठी परिचित आहे. तो इंडियन सुपर लीगसाठी २०१४ मध्ये गोव्याकडून खेळला. यंदा तो आय लीगमध्ये गोकुलम केरळ एफसीचा खेळाडू होता.
>बांगला देशविरुद्ध ज्या चुका झाल्या त्या टाळून सहकाऱ्यांना संधीचा लाभ घ्यावा लागेल. भारताचा बचाव फळीतील खेळाडू अनस इडाथेडिका याच्या आईचे निधन झाल्यामुळे तो भारतात परतला आहे. याश्विाय रॉलिन बोंर्जेस हा जखमी आहे. - सुनील छेत्री

Web Title: India needs victory against Afghanistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.