इंडियन सुपर फुटबॉल लीग नव्या फॉरमॅटमध्ये; २९ सप्टेंबरपासून पाचव्या हंगामाला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2018 11:34 AM2018-08-26T11:34:29+5:302018-08-26T11:35:04+5:30
इंडियन सुपर फुटबॉल लीगच्या ( ISL) पाचव्या हंगामाला २९ सप्टेंबरपासून कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियमवरून सुरुवात होणार आहे.
मुंबई - इंडियन सुपर फुटबॉल लीगच्या ( ISL) पाचव्या हंगामाला २९ सप्टेंबरपासून कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियमवरून सुरुवात होणार आहे. ISL चा चषक दोनवेळा उंचावणाऱ्या ॲटलेटिको दी कोलकाता आणि केरळा ब्लास्टर्स यांच्यात उद्घाटनीय सामना खेळवण्यात येणार आहे. सलग दुसऱ्या वर्षी लीगचा पहिला सामना कोलकाता आणि केरळ यांच्यात होणार आहे.
गतउपविजेत्या बेंगळूरु एफसी आणि गतविजेत्या चेन्नईयन एफसी यांच्यात दुसरा सामना ३० सप्टेंबरला बेंगळूरुत खेळवला जाईल. २०१७-१८ च्या अंतिम सामन्याची ही पुनर्लढत असेल. त्यापाठोपाठ नॉर्थ ईस्ट युनायटेड आणि एफसी गोवा, तर मुंबई एफसी आणि जमशेदपूर एफसी यांच्यात लढती होतील. आता केवळ ५९ लढतींचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
🚨🚨 FIXTURES ARE OUT 🚨🚨#HeroISL 2018-19 starts on September 2⃣9⃣ with a mouthwatering clash between former champions @WorldATK and rivals @KeralaBlasters in Kolkata 💥
— Indian Super League (@IndSuperLeague) August 25, 2018
Read: https://t.co/XuGcmrRrNc
Fixtures: https://t.co/NkmuEE7trE#LetsFootballpic.twitter.com/qfb9uHlgnL
२०१८-१९ हे हंगाम तीन टप्प्यांत पार पडणार आहे. फिफा विंडोमुळे ८ ते १६ ऑक्टोबर व १२ ते २० नोव्हेंबर या कालावधीत ISL चे सामने होणार नाही. २०१९ मध्ये युएईत होणाऱ्या आशियाई चषक स्पर्धेच्या तयारीसाठी १७ डिसेंबरपासून ISLच्या लढती होणार नाहीत. त्याशिवाय आगामी हंगामात दिवसाला दोन सामने नसतील आणि प्रत्येक सामना सायंकाळी ७:३० वाजल्यापासून खेळविण्यात येईल.