भारतीय संघाने केला कसून सराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 02:49 AM2017-10-03T02:49:24+5:302017-10-06T11:42:14+5:30

येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या मैदानावर सोमवारी मुख्य मार्गदर्शक लुई नोर्टन डी माटोस यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने दोन तास सराव केला.

The Indian team has practiced well | भारतीय संघाने केला कसून सराव

भारतीय संघाने केला कसून सराव

Next

नवी दिल्ली : येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या मैदानावर सोमवारी मुख्य मार्गदर्शक लुई नोर्टन डी माटोस यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने दोन तास सराव केला. यापूर्वी भारतीय संघ गुडगाव येथील हेरिटेज शाळेच्या मैदानावर सराव करीत होते. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या ट्विटरवर भारतीय संघातील खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. याला उत्तर देताना भारतीय संघातील खेळाडूंनी कोहलीने दिलेल्या शुभेच्छांना उत्तर दिले की, आम्ही चांगले प्रदर्शन करण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही.
जर्मनीचा संघ सोमवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास गोव्यात दाखल झाला होता. सरळ संघाने हॉटेल गाठले. दुसºया दिवशी त्यांनी हलका सराव केला. मात्र, या संघासोबत कर्णधार नव्हता.कर्णधार जॉन फिइटे आर्प हा संघासोबत नसल्याने चर्चा रंगली. अखेर आर्पचे मंगळवारी आगमन झाले.
या स्पर्धेत सहभागी होणाºया मालीच्या संघाचे मुंबई येथे आगमन झाले. मालीचा संघ ब गटात असून ६ आॅक्टोबर रोजी त्यांची पहिली लढत पॅराग्वेविरुद्ध होईल. तुर्की आणि न्यूझीलंड हे दोन संघ याच गटात आहेत. (वृत्तसंस्था)

घाना, अमेरिका संघ दिल्लीत
1घाना संघ आज दिल्लीत पोहोचला. अमेरिका संघ काल रात्रीच इंदिरा गांधी विमानतळावर पोहोचला होता. घाना संघाचे दुपारी आगमन झाले. दोन्ही संघ सरळ हॉटेलमध्ये पोहोचले.घाना संघ अबुधाबी येथून सरळ दिल्लीत आला.
2घाना आणि अमेरिका हे दोन्ही संघ मजबूत आहेत. हे संघ यजमान भारत आणि कोलंबियाच्या गटात आहेत. घानाचा पहिला सामना ६ आॅक्टोबर रोजी कोलंबियाविरुद्ध होईल. त्यानंतर ९ रोजी अमेरिकाविरुद्ध, तर १२ रोजी भारताविरुद्ध होईल.
3दुसरीकडे, अमेरिका संघही दिल्लीत पोहोचला. हा संघ दुबई येथून आला. त्यांनी दुबईत सात दिवसांचे प्रशिक्षण शिबिर घेतले. हा संघ ‘अ’ गटात असून भारत, कोलंबिया आणि घाना यांच्याविरुद्ध ते खेळणार आहेत. त्यांचा पहिला सामना दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर, तर तिसरा सामना मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर होईल.

इराक संघ कोलकात्यात
आशियाई चॅम्पियन इराक संघ दुपारी २ वाजता कोलकात्यात पोहोचला. संघाच्या स्थानिक अधिकाºयाने सांगितले की, इराक संघ २१ खेळाडूंसोबतच प्रशिक्षक जातिर यांच्यासह दाखल झाला.
या संघाने कोलकाता येथे पोहोचल्यावर सायंकाळी एका खासगी मैदानावर ३ वाजल्यापासून २ तास सराव केला. सरावादरम्यान कोणत्याही वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींना आणि फुटबॉलप्रेमींना मैदानावर प्रवेश नाकारण्यात आला.

देशात पहिल्यांदाच होणाºया १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत एक अनोखा विक्रम पाहायला मिळणार आहे.ही स्पर्धा सहा शहरांच्या मैदानांवर होत आहे. त्यात कोची येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियम आणि गुवाहाटी येथील इंदिरा गांधी स्टेडियम यांच्यातील अंतर २४३१ किलोमीटर इतके आहे.
स्पर्धेच्या इतिहासातील हा एक विक्रमच आहे. या स्टेडियमसोबत दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियम आणि गोव्यातील स्टेडियम, मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियम आणि कोलकाताचे विवेकानंद युवा भारती क्रीडांगण यांचा समावेश आहे.

Web Title: The Indian team has practiced well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.