भारतीय संघ फुटबॉल आशिया चषकासाठी पात्र; भारत-अफगाण सामना अनिर्णीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 05:53 IST2021-06-17T05:53:29+5:302021-06-17T05:53:52+5:30
अफगाणचा गोलकीपर ओवेस अजीजी याने ७५व्या मिनिटाला नोंदविलेल्या आत्मघाती गोलमुळे भारताला आघाडी मिळाली. मात्र भारतीय खेळाडू आघाडी कायम राखण्यात अपयशी ठरले.

भारतीय संघ फुटबॉल आशिया चषकासाठी पात्र; भारत-अफगाण सामना अनिर्णीत
दोहा : फिफा विश्वचषक २०२२ आणि आशियाई चषक २०२३साठी येथे खेळविल्या जात असलेल्या पात्रता फेरीत भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना १-१ असा
बरोबरीत राहिला. सामना अनिर्णीत राहिला तरी भारतीयफुटबॉल संघ आपल्या गटात तिसऱ्या स्थानावार आल्यामुळे आगामी आशिया चषक फुटबॉलसाठी पात्र ठरला
आहे.
अफगाणचा गोलकीपर ओवेस अजीजी याने ७५व्या मिनिटाला नोंदविलेल्या आत्मघाती गोलमुळे भारताला आघाडी मिळाली. मात्र भारतीय खेळाडू आघाडी कायम राखण्यात अपयशी ठरले. ८२व्या मिनिटाला होसेन जमानी याने बरोबरी साधणारा गोल नोंदविला. यंदा भारतीय संघ कतार आणि ओमानसारख्या बलाढ्य संघांना टक्कर देण्यात यशस्वी झाला.
भारत ई गटात तिसरा
भारतीय संघ अफगाणविरुद्ध सामना अनिर्णीत ठेवल्यामुळे ई गटात तिसऱ्या स्थानावर आला. भारताने आठपैकी केवळ एक सामना जिंकला. चार सामने अनिर्णीत राहिले, तर तीन सामन्यात पराभव झाला.