जर्मनीला इराणचा धक्का : युनूस डेल्फीचे दोन गोल, बाद फेरीत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 01:25 AM2017-10-11T01:25:58+5:302017-10-11T01:26:11+5:30

स्ट्रायकर युनूस डेल्फीच्या शानदार दोन गोलच्या बळावर इराणने मजबूत जर्मनी संघाला ४-० ने धक्का दिला. या विजयाबरोबरच इराणने १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीत आपला प्रवेश निश्चित केला.

 Iran's shock to Germany: Yunus Delphi two goals, in the next round | जर्मनीला इराणचा धक्का : युनूस डेल्फीचे दोन गोल, बाद फेरीत प्रवेश

जर्मनीला इराणचा धक्का : युनूस डेल्फीचे दोन गोल, बाद फेरीत प्रवेश

Next

पणजी : स्ट्रायकर युनूस डेल्फीच्या शानदार दोन गोलच्या बळावर इराणने मजबूत जर्मनी संघाला ४-० ने धक्का दिला. या विजयाबरोबरच इराणने १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीत आपला प्रवेश निश्चित केला. ‘क’ गटातील हा सामना फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळविण्यात आला.
सामन्यात युनूस डेल्फी याने सहाव्या आणि ४२व्या मिनिटाला तर सय्यद अल्लाहयारने ४९व्या मिनिटाला तर बदली खेळाडू वाहिद नामदारीने ७५व्या मिनिटाला प्रत्येकी एक गोल नोंदवला. या विजयानंतर इराणने दोन सामन्यांत सहा गुण तर जर्मनीने आतापर्यंत दोन सामन्यांत तीन गुण मिळविले आहेत.
पहिल्या हाफच्या सुरुवातीला जर्मनीने प्रतिस्पर्धी संघावर दबाव निर्माण केला. जर्मनीचा गोलरक्षक लुका प्लोगमेनने सहाव्या मिनिटाला उत्कृष्ट बचाव केला. त्यानंतरही त्याने चार वेळा चेंडू अडविला. इराणने सहाव्या मिनिटाला गोल नोंदवल्यानंतर २५व्या मिनिटालाही जर्मनीला सुवर्णसंधी मिळाली होती. मात्र, इराणचा गोलरक्षक घोलाम जादेहर याने हा प्रयत्न अपयशी ठरवला. पहिल्या सत्राच्या अंतिम क्षणांत इराणने आक्रमक पवित्रा घेतला. ४२व्या मिनिटाला डेल्फी याने आपला व संघाचा दुसरा गोल नोंदवला. मध्यंतरापर्यंत इराण २-० ने
आघाडीवर होता. त्यानंतरही त्यांचाच दबदबा होता. जर्मनीला संधी मिळाल्या होत्या; मात्र त्यांना फायदा उठवता आला नाही. इराण आता १३ रोजी कोस्टारिका संघाविरुद्ध तर जर्मनीचा संघ गिनी संघाविरुद्ध भिडणार आहे.

Web Title:  Iran's shock to Germany: Yunus Delphi two goals, in the next round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.