Bad News : इंग्लंडच्या वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूचे निधन; क्रीडा विश्वातून हळहळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 02:11 PM2020-07-11T14:11:11+5:302020-07-11T14:11:58+5:30

कोरोना व्हायरसच्या संकटात आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाल्यामुळे इंग्लंडमधील क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचा वातावरण आहे.

Jack Charlton, a member of England World Cup-winning team of 1966, has passed away | Bad News : इंग्लंडच्या वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूचे निधन; क्रीडा विश्वातून हळहळ

Bad News : इंग्लंडच्या वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूचे निधन; क्रीडा विश्वातून हळहळ

Next

इंग्लंड-वेस्ट इंडिज कसोटी मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पदार्पण झालेले असताना शनिवारी इंग्लंडच्या क्रीडा विश्वाला मोठा धक्का देणारी बातमी समोर आली. इंग्लंडच्या फुटबॉल वर्ल्ड कप विजेत्या संघातील खेळाडू जॅक चार्ल्टन यांचे 85व्या वर्षी प्रदीर्घ आजारानं निधन झालं. 1966च्या वर्ल्ड कप विजेत्या संघात त्यांनी सेंटर बॅकची भूमिका पार पाडली होती. नॉर्थम्बरलँड येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  

जॅक यांनी संपूर्ण क्लब कारकिर्द लीड्स युनायटेडमध्ये घालवली. त्यांनी 1950 ते 1973 या कालावधीत लीड्स क्लबचे प्रतिनिधित्व केलं आणि 773 सामने खेळले. या क्लबनेही शोक व्यक्त केला. जॅक हे इंग्लंड आणि मँचेस्टर युनायटेड संघाचे माजी मध्यरक्षक बॉबी यांचे बंधू आहेत. त्यांनी 1953मध्ये लीड्ससाठी पदार्पण केले. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर क्लबने 1969मध्ये पहिल्या विभागीय स्पर्धेचे आणि 1972मध्ये एफए चषक जिंकला.

1966मध्ये त्यांनी ज्युलेस रिमेट चषक जिंकला. 1984-85च्या मोसमात जॅक यांनी न्यूकॅसल युनायटेड संघाला मार्गदर्शन केले. त्यानंतर 1986मध्ये ते रिपल्बिक ऑफ आयर्लंड संघाचे मॅनेजर झाले.

1990च्या वर्ल्ड कप स्पर्धेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघानं पहिला वर्ल्ड कप खेळला आणि थेट उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली. 1996मध्ये त्यांनी निवृत्ती जाहीर केली. 1958मध्ये त्यांनी पॅट केम्प यांच्याशी विवाह केला आणि त्यांना तीन मुलं आहेत.


अन्य महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्राच्या सुपुत्राला सलाम; ऑलिम्पिकपटू दत्तू भोकनळ शेतात गाळतोय घाम!

पुढील महिन्यात सुरू होणार ट्वेंटी-20 लीग; शाहरुख खानच्या संघातून खेळणार प्रविण तांबे!

दिल्ली टू केनिया व्हाया मुंबई; भारताचा क्रिकेटपटू करणार केनियाच्या राष्ट्रीय संघातून पदार्पण?

भारतीय क्रिकेटपटूची आई बनली 'कोरोना वॉरियर'; संकटकाळात करतेय 'बेस्ट' काम!

कोरोना व्हायरसच्या संकटात सुरेश रैना अन् रिषभ पंतची धम्माल मस्ती; Video Viral 

Web Title: Jack Charlton, a member of England World Cup-winning team of 1966, has passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.