झारखंडच्या मुलीची फुटबॉलमध्ये छाप, मुंबईतील शिबिरात उमटवला ठसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 04:20 AM2018-01-14T04:20:11+5:302018-01-14T04:20:14+5:30

महिला सक्षमीकरण किंवा मुलींच्या शिक्षण जागृतीसाठी कितीही उपक्रम आज देशभरात सुरू असले, तरी भारतातील काही भागांत आजही मुलींना आपल्या आवडीचे क्षेत्र निवडण्याचे स्वातंत्र्य नाही. चर्चगेट येथील वायएमसीए मैदानावर सुरू असलेल्या फुटबॉल शिबिरामध्ये सहभागी झालेल्या झारखंडच्या नीता कच्चप हिच्याशी संवाद साधल्यानंतर हीच बाब पुढे आली.

Jharkhand girl's impression in football, impression in Mumbai camp | झारखंडच्या मुलीची फुटबॉलमध्ये छाप, मुंबईतील शिबिरात उमटवला ठसा

झारखंडच्या मुलीची फुटबॉलमध्ये छाप, मुंबईतील शिबिरात उमटवला ठसा

Next

मुंबई : महिला सक्षमीकरण किंवा मुलींच्या शिक्षण जागृतीसाठी कितीही उपक्रम आज देशभरात सुरू असले, तरी भारतातील काही भागांत आजही मुलींना आपल्या आवडीचे क्षेत्र निवडण्याचे स्वातंत्र्य नाही. चर्चगेट येथील वायएमसीए मैदानावर सुरू असलेल्या फुटबॉल शिबिरामध्ये सहभागी झालेल्या झारखंडच्या नीता कच्चप हिच्याशी संवाद साधल्यानंतर हीच बाब पुढे आली.
झारखंडच्या ओर्मांची जिल्ह्यातील असलेली नीता फुटबॉलच्या निमित्ताने पहिल्यांदाच जिल्ह्याबाहेर पडली. मायानगरी म्हणून ओळख असलेल्या मुंबईचा झगमगाट तिने पहिल्यांदाच अनुभवला. मात्र, यासाठी तिला कठोर मेहनतीशिवाय गावकºयांच्या टीकेलाही सामोरे जावे लागले. नीताला फुटबॉलची प्रचंड आवड. पण फुटबॉल खेळताना परिधान कराव्या लागणाºया कपड्यांमुळे गावकºयांच्या टीकेला तिला सामोरे जावे लागायचे. त्यामुळे ती स्पर्धात्मक स्तरापर्यंत खेळू शकत नव्हती.
मुंबईस्थित आॅस्कर फाउंडेशनने घेतलेल्या ‘किक लाइक अ गर्ल’ या विशेष शिबिरामध्ये सहभाग घेतल्यानंतर मात्र नीताच्या फुटबॉल वेडाला योग्य दिशा मिळाली. दोन वर्षांपासून फुटबॉलचे प्रशिक्षण घेत असलेली नीता आज तिच्या गावातील युवापिढीसाठी एक आदर्श बनली असून अनेक मुली तिच्याप्रमाणेच फुटबॉलमध्ये करिअर घडवण्यास उत्सुक असल्याची माहिती आॅस्कर फाउंडेशनने दिली.


मला फुटबॉल खेळायचे होते, पण मुलांप्रमाणे शॉटर््स घालून खेळावे लागत असल्याने गावकºयांच्या टीकेला सामोरे जावे लागत होते. ‘तू मुलांप्रमाणे शॉटर््स घालून कशी खेळू शकते?’ यासारख्या अनेक प्रश्नांनी मला भंडावून सोडले होते. पण आॅस्कर फाउंडेशनच्या शिबिराने आत्मविश्वास मिळवून दिल्यानंतर मी गावकºयांची मानसिकता बदलू शकले.
- नीता कच्चप

Web Title: Jharkhand girl's impression in football, impression in Mumbai camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.