ब्राझील अंतिम चारमध्ये, जर्मनीवर २-१ गोलने मात, ६ मिनिटांत केले दोन गोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 04:01 AM2017-10-23T04:01:24+5:302017-10-23T04:01:33+5:30
ब्राझीलने पिछाडीवर पडल्यानंतर जोरदार मुसंडी मारताना व उत्तरार्धात सहा मिनिटांत दोन गोल करताना जर्मनीवर २-१ असा विजय मिळवताना फिफा अंडर १७ वर्ल्डकपमध्ये उपांत्य फेरी गाठली.
कोलकाता : ब्राझीलने पिछाडीवर पडल्यानंतर जोरदार मुसंडी मारताना व उत्तरार्धात सहा मिनिटांत दोन गोल करताना जर्मनीवर २-१ असा विजय मिळवताना फिफा अंडर १७ वर्ल्डकपमध्ये उपांत्य फेरी गाठली. जर्मनीने जॉन फिएटे आर्पच्या २१ व्या मिनिटाला पेनल्टीवर केलेल्या गोलमुळे आघाडी घेतली होती. त्यानंतर त्यांनी पुढील ५० मिनिटे ही आघाडी कायम ठेवली. ब्राझीलकडून वेवरसनने ७१ व्या मिनिटाला बरोबरीचा गोल केला, तर ७७ व्या मिनिटाला पालिन्हो याने निर्णायक गोल केला. ब्राझील गुवाहाटीत २५ आॅक्टोबरला होणाºया पहिल्या उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध खेळेल. विवेकानंद युवा भारती क्रीडांगणात ६६ हजार ६१३ प्रेक्षकांसमोर ब्राझीलने चांगली सुरुवात केली. सहाव्या मिनिटाला त्यांना आघाडी घेण्याची संधी होती. तेव्हा ब्रेनरच्या पासवर एलन याने मारलेला फटका गोलपोस्टवर आदळला.
>स्पेन उपांत्य फेरीत
कोची : युरोपियन चॅम्पियन स्पेनने लौकिकाला साजेशी कामगिरी करताना रविवारी इराणचा ३-१ ने पराभव केला आणि फिफा अंडर-१७ विश्वकप फुटबॉल स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत स्पेनला आफ्रिकन चॅम्पियन माली संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. स्पेनतर्फे अबेल रुईज (१३ वा मिनिट), सर्जियो गोमेज (६० वा मिनिट) आणि फेरान टोरेस (६७ वा मिनिट) यांनी गोल नोंदवले, तर यापूर्वी एकही लढत न गमावणाºया इराणतर्फे एकमेव गोल सईद करिमी (६९ वा मिनिट) याने केला.