OMG : स्टेडियमवर झळकला ओसामा बीन लादेनचा कट आऊट अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 03:28 PM2020-06-25T15:28:24+5:302020-06-25T15:36:21+5:30

फुटबॉल क्लबला तो कट आऊट हटवावा लागला

Leeds United Remove Cardboard Cutout of Osama bin Laden from Stands | OMG : स्टेडियमवर झळकला ओसामा बीन लादेनचा कट आऊट अन्...

OMG : स्टेडियमवर झळकला ओसामा बीन लादेनचा कट आऊट अन्...

Next

कोरोना व्हायरसमुळे मागील दोन-अडीच महिने जगभरातील क्रीडा स्पर्धा स्थगित करण्यात आल्या होत्या. पण, आता हळुहळू फुटबॉल स्पर्धांना सुरुवात झाली आहे. नियमांचं काटेकोर पालन करून या स्पर्धा घेतल्या जात आहेत. स्टेडियममध्ये अजूनही प्रेक्षकांना प्रवेश दिला जात नाही. पण, खेळाडूंना प्रेक्षकांचा फिल मिळावा, याकरिता स्टेडियमवच्या रिकामी बाकावर प्रेक्षकांच्या चेहऱ्यांचे कट आऊट ठेवण्यात येत आहेत. त्यासाठी क्लब प्रेक्षकांकडून पैसेही घेत आहेत. अशाच प्रेक्षकांच्या कट आऊटमध्ये दहशतवादी ओसामा बीन लादेनचा कट आऊट आढळल्यानं सर्वांना धक्का बसला. सोशल मीडियावर तो फोटो व्हायरल झाल्यानंतर आयोजकांना त्यांची चूक सुधारावी लागली.

लीड्स युनायटेड क्लबनं ओसामा बीन लादेनचा कट आऊट प्रेक्षकांच्या कट आऊटसोबत ठेवला होता. फुलहॅम क्लबविरुद्धच्या सामन्यात हे सर्व कट आऊट्स ठेवण्यात आले होते. चाहत्यांना त्यांचा कट आऊट स्टेडियमवर लावण्याची संधी क्लबनं दिली आणि त्यासाठी काही रक्कमही मोजली. पण, त्यांचा कट आऊट ओसामा बीन लादेनच्या कट आऊट शेजारी दिसल्याचे पाहून अनेकांना धक्का बसला आणि सोशल मीडियावरून त्यांनी राग व्यक्त केला.





पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून बिग बी होताहेत ट्रोल; 'ते' ट्विट होतंय व्हायरल

पाकिस्तान क्रिकेट मंडळाला वाटतेय भीती; BCCI कडून मागितली लेखी हमी

दिल्ली डेअरडेव्हिल्सनं विराट कोहलीला संघात का घेतलं नाही ? मोठा खुलासा

IPL 2020 साठी BCCIने पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडे केली विनंती!

Photo : या सुंदरीनं जिंकलाय जगातील 'सेक्सी' रेफरीचा किताब; फुटबॉलपटूही पडलेत प्रेमात!

पाच महिन्यांनंतर रोहित शर्मा मैदानावर सरावासाठी उतरला; म्हणाला...

Web Title: Leeds United Remove Cardboard Cutout of Osama bin Laden from Stands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.