लिओनेल मेस्सीने 8 कोटींच्या टिश्यू पेपरने डोळे पुसले होते का? संपूर्ण प्रकरण जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 03:52 PM2022-12-20T15:52:30+5:302022-12-20T15:54:04+5:30

अर्जेंटीनाने फिफा वर्ल्ड कप 2022 च्या अंतिम सामन्यात फ्रान्सला हरवून फिफा कपवर आपले नाव कोरले. अर्जेंटीनाचा कर्णधार स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीने जोरदार खेळी करत विजय खेचून आणला.

lionel messi tissue paper price 1 million dollar twitter lionel messi tissue paper video | लिओनेल मेस्सीने 8 कोटींच्या टिश्यू पेपरने डोळे पुसले होते का? संपूर्ण प्रकरण जाणून घ्या

लिओनेल मेस्सीने 8 कोटींच्या टिश्यू पेपरने डोळे पुसले होते का? संपूर्ण प्रकरण जाणून घ्या

googlenewsNext

अर्जेंटीनाने फिफा वर्ल्ड कप 2022 च्या अंतिम सामन्यात फ्रान्सला हरवून फिफा कपवर आपले नाव कोरले. अर्जेंटीनाचा कर्णधार स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीने जोरदार खेळी करत विजय खेचून आणला. जगभरातील फॅन्सनी विजय साजरा केला, मेस्सी जगभरात प्रसिद्ध आहे. सध्या मेस्सीच्या अनेक बातम्या समोर येत आहेत. यात एक बातमी ती म्हणजे गेल्या काही दिवसापूर्वी लिओनेल मेस्सीने 8 कोटी रुपयांच्या टिश्यू पेपरने डोळे पुसल्याची बातमी व्हायरल झाली आहे.

लिओनेल मेस्सीने बर्‍याच दिवसानंतर ऑगस्ट 2021 मध्ये बार्सिलोना फुटबॉल क्लब सोडला होता. यावेळी मेस्सी बोलताना खूप भावूक झाला होता. त्यावेळी त्याने ज्या टिश्यू पेपरने आपले अश्रू पुसले त्याची किंमत जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

ऑगस्ट 2021 मध्ये बार्सिलोना फुटबॉल क्लबमधून बाहेर पडण्याची घोषणा करताना मेस्सी भावूक झाला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. त्यानंतर त्यांच्या पत्नीने त्याला टिश्यू पेपर दिला. मेस्सीने या टिश्यू पेपरने आपले अश्रू पुसले. त्यावेळी या टिश्यू पेपरची किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात जाऊ शकते, असे कुणालाही वाटले नसेल, पण एका चाहत्याने या टिश्यू पेपरची बोली लावली. 

lionel messi Fan: मेस्सीचा भारतातील जबरा फॅन! अर्जेंटिनाच्या विजयानंतर वाटली 1500 प्लेट मोफत बिर्याणी

बार्सिलोना क्लबसोबतच्या निरोपाच्या सोहळ्यात लिओनेल मेस्सी ढसाढसा रडला होता. 2000 साली वयाच्या 16 व्या वर्षी बार्सिलोना क्लबकडून लिओनेल मेस्सीनं पदार्पण केलं. 21 वर्षांनंतर त्यानं क्लब सोडण्याचा निर्णय घेतला अन् निरोपाच्या भाषणात त्याला रडताना पाहून चाहतेही हळहळले होते.

लिओनेल मेस्सीने पत्रकार परिषद घेऊन बार्सिलोना क्लब सोडण्याचा निर्णय जाहीर केला. त्यादरम्यान, मेस्सीच्या एका चाहत्याने तो टिश्यू पेपर सुरक्षित ठेवला. मेस्सीने वापरलेला टिश्यू पेपर एका वेबसाइटवर विकला. या वेबसाईटवर टिश्युपेपरची किंमत 10 लाख डॉलर्स म्हणजेच सुमारे 8 कोटी रुपये लावण्यात आली होती. ही बोली पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. 

Web Title: lionel messi tissue paper price 1 million dollar twitter lionel messi tissue paper video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.