लिओनेल मेस्सीचा 'प्रॅक्टिस पार्टनर', पाहाल तर थक्क व्हाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 09:45 AM2018-07-31T09:45:21+5:302018-07-31T10:08:03+5:30
फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील अपयशानंतर अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सी कुटुंबीयांसोबत प्रदीर्घ सुट्टीवर गेला होता.
माद्रिद - फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील अपयशानंतर अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सी कुटुंबीयांसोबत प्रदीर्घ सुट्टीवर गेला होता. कोणत्यातरी बेटावर निवांत वेळ व्यथित करताना मेस्सीने फुटबॉलपासून स्वतःला दूर ठेवणे पसंत केले होते. मात्र,विश्रांतीनंतर फुटबॉल लीगच्या नव्या हंगामासाठी मेस्सी सज्ज झाला आहे. विश्वचषक स्पर्धेतील अपयशाचे नैराश्य मागे सोडून बार्सिलोना क्लबला अनेक विक्रमी जेतेपद जिंकून देण्यासाठी त्याने कंबर कसली आहे.
ला लीगा आणि चॅम्पियन्स लीग स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून मेस्सी सरावाला लागला आहे. पुढील हंगामासाठी स्वतःला तंदुरूस्त ठेवण्यासाठी ज्या पद्धतीने मेस्सी सराव करत आहे, ते पाहून त्याचे चाहते नक्की सुखावतील. फुटबॉलच्या मैदानावर कौशल्याने प्रतिस्पर्धीना चकवण्यात तरबेज असलेल्या मेस्सीने सोमवारी त्यामागील रहस्य उलगडले. चाहत्यांना त्याने 'सेनॉर हल्क' या प्रॅक्टिस पार्टनरची ओळख करून दिली. हल्क हा जगातील सर्वोत्तम बचावपटूंना मागे टाकण्याची क्षमता राखतो. त्याच्यासोबतच्या सरावामुळेच मेस्सी प्रतिस्पर्धी खेळाडूंना मोठ्या खुबीने चकवतो.
कोण आहे मेस्सीचा प्रॅक्टिस पार्टनर, पाहा हा व्हिडीओ...
Messi, messing around.
— MESSISTATS (@MESSlSTATS_) July 30, 2018
Via Antonella Ig: 🦁⚽️ pic.twitter.com/niPKLX3IFA
हा सेनॉर हल्क म्हणजे मेस्सीचा पाळीव श्वान. हल्कसोबत मेस्सी चेंडूवर नियंत्रण राखणे आणि प्रतिस्पर्धीला चकवण्याचा सराव करतो. 2016 मध्ये मेस्सी जेव्हा दुखापतीतून सावरत होता, त्यावेळी त्याला लहानसा पपी भेट म्हणून देण्यात आला होता. तोच तो हा हल्क.