फुटबॉल विश्वाला धक्का; सामन्यासाठी सराव करताना 22 वर्षीय खेळाडूचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 12:00 PM2020-04-21T12:00:15+5:302020-04-21T12:00:49+5:30
खेळाडूंची ऑनलाईन फिटनेस टेस्ट घेतली
कोरोना व्हायरसमुळे अनेक देशांत लॉकडाऊन जाहीर झाला आहे. त्यामुळे अनेक क्रीडा स्पर्धाही रद्द झाल्या आहेत आणि खेळाडू घरच्या घरी आपल्या तंदुरुस्तीसाठी कसरत करत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं त्यांच्या खेळाडूंची ऑनलाईन फिटनेस टेस्ट घेतली. रूसमधील काही फुटबॉल क्लब्सचे खेळाडू वैयक्तिक सराव करत आहेत. याच दरम्यान एक दुर्दैवी घटना घडली.
लोकोमोटिव्ह मॉस्को क्लबचा बचावपटू इनोकेंटी समोखव्हालोव्हचे सराव सत्रात निधन झाले. रुसच्या फुटबॉल क्लबने ही माहीती दिली. लोकोमोटिव्ह मॉस्कोचा 22 वर्षीय खेळाडू वैयक्तिक सराव सत्रात अचानक आजारी पडला आणि त्यानंतर त्याचे निधन झाले. त्याच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 2015मध्ये समोखव्हालोव्ह लोकोमोटिव्ह क्लबचा सदस्य झाला होता. पण, त्यानं रूस प्रीमिअर लीगमध्ये अजून क्लबचे प्रतिनिधित्व केलेले नाही.
We are truly sad to announce the death of Kazanka defender – Innokentiy Samokhvalov.
— FC Lokomotiv Moscow (@fclokomotiv_eng) April 20, 2020
He had a wife and a son.
Kesha was a kind, helpful person and a good friend. We are truly shocked by what happened and express our sincere condolences to his family and friends. pic.twitter.com/LgpcHMdB8d