रोनाल्डो-मेस्सी यांच्याशिवाय झालेल्या 'El - Clasico' लढतीत चमकला 'हा' खेळाडू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 10:29 AM2018-10-29T10:29:28+5:302018-10-29T10:31:00+5:30

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट युद्धाप्रमाणे बार्सिलोना आणि रेयाल माद्रिद या ला लीगातील दोन बलाढ्य क्लबमध्ये टशन असते.

Luis Suarez hits hat-trick as Barcelona blow away Real Madrid | रोनाल्डो-मेस्सी यांच्याशिवाय झालेल्या 'El - Clasico' लढतीत चमकला 'हा' खेळाडू

रोनाल्डो-मेस्सी यांच्याशिवाय झालेल्या 'El - Clasico' लढतीत चमकला 'हा' खेळाडू

googlenewsNext

कॅम्प न्यू : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट युद्धाप्रमाणे बार्सिलोना आणि रेयाल माद्रिद या ला लीगातील दोन बलाढ्य क्लबमध्ये टशन असते. त्यात लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तीयानो रोनाल्डो हे समोरासमोर येणार म्हणजे चाहत्यांसाठी पर्वणीच. पण El Clasico म्हणजे मेस्सी विरुद्ध रोनाल्डो ही २००९ पासून सुरू आलेली परंपरा रविवारी संपुष्टात आली. ९ वर्षानंतर प्रथमच El Clasico लढत जगातील दोन दिग्गज खेळाडूंशिवाय झाली. या सामन्यात लूईस सुआरेझने तीन गोल करताना यजमान बार्सिलोनाला ५-१ असा विजय मिळवून दिला.



दुखापतीमुळे मेस्सी या सामन्यात खेळू शकला नाही, तर रोनाल्डोने माद्रिदला सोडचिठ्ठी दिली आहे. तो आता इटालियन क्लब युव्हेन्टसचे प्रतिनिधित्व करत आहे. मेस्सीला प्रेक्षकाच्या भूमिकेतून हा सामना पाहताना अत्यंत आनंद होत होता.


फिलिट कुटीन्होने ( 11 मि. ) बार्सिलोनाला आघाडी मिळवून दिली. त्यात सुआरेझचे ( 30, 75 व 83 मि.) तीन गोल व आर्टुरो विडाल ( 87 मि.) याचा एक गोल याच्या जोरावर बार्सिलोनाने विजय मिळवला. लिओनेल मेस्सीनंतर ( 2014) El Clasico लढतीत हॅटट्रिक नोंदवणारा सुआरेझ पहिला खेळाडू ठरला. 


 

Web Title: Luis Suarez hits hat-trick as Barcelona blow away Real Madrid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.