लुईस सुआरेझ शुक्रवारी खेळणार अखेरचा सामना, पॅराग्वेविरुद्धच्या सामन्यानंतर घेणार निवृत्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 06:31 AM2024-09-04T06:31:10+5:302024-09-04T06:31:47+5:30
Luis Suarez : उरुग्वेचा अनुभवी स्ट्रायकर लुईस सुआरेझ याने आंतरराष्ट्रीय फुटबाॅलमधून निवृत्तीची घोषणा केली. लिव्हरपूल आणि बार्सिलोना क्लबकडून खेळलेल्या या ३७ वर्षीय खेळाडूने उरुग्वेकडून १४२ सामन्यांत ६९ गोल केले आहेत. हा उरुग्वेकडून नोंदवलेला विक्रम आहे.
मोंटेवीडियो : उरुग्वेचा अनुभवी स्ट्रायकर लुईस सुआरेझ याने आंतरराष्ट्रीय फुटबाॅलमधून निवृत्तीची घोषणा केली. लिव्हरपूल आणि बार्सिलोना क्लबकडून खेळलेल्या या ३७ वर्षीय खेळाडूने उरुग्वेकडून १४२ सामन्यांत ६९ गोल केले आहेत. हा उरुग्वेकडून नोंदवलेला विक्रम आहे.
सुआरेझ आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना शुक्रवारी पॅराग्वे विरुद्ध खेळणार आहे. सुआरेझने सोमवारी सेंटेनारियो स्टेडियममध्ये सांगितले की, ‘हे सांगताना दु:ख होत आहे, पण शुक्रवारचा सामना माझा देशासाठी खेळतानाचा शेवटचा सामना असेल.’
उरुग्वे शुक्रवारी विश्वचषक पात्रता सामन्यात पॅराग्वचेे यजमानपद भूषविणार आहे. सुआरेझने २००७मध्ये आंतरराष्ट्रीय फुटबाॅलमध्ये पदार्पण केले होते. त्याने उरुग्वेकडून चार विश्वचषक आणि पाच कोपा अमेरिका स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. तो क्लब पातळीवर खेळत राहणार आहे. सुआरेझ आता इंटर मियामी क्लबशी करारबद्ध आहे.