Major League Soccer: रक्तबंबाळ वेन रूनीला पाहून चाहते घाबरले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 11:15 AM2018-07-30T11:15:30+5:302018-07-30T11:16:09+5:30
वेन रूनीने मेजर लीग सॉकरमध्ये डीसी युनायडेड क्लबला विजय मिळवून दिला. इंग्लंडकडून सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम नावावर असलेल्या रूनीने ३३व्या मिनिटाला केलेला गोल डीसी युनायटेड क्लबच्या विजयासाठी पुरेसा ठरला.
अमेरिका - वेन रूनीने मेजर लीग सॉकरमध्ये डीसी युनायडेड क्लबला विजय मिळवून दिला. इंग्लंडकडून सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम नावावर असलेल्या रूनीने ३३व्या मिनिटाला केलेला गोल डीसी युनायटेड क्लबच्या विजयासाठी पुरेसा ठरला. मात्र सामना संपण्यापूर्वी अशी घटना घडली ज्याने स्टेडियमवर उपस्थित सर्व चाहते स्तब्ध राहीले. युनायटेडने 2-1 अशा फरकाने कोलोरॅडो रॅपिड्स क्लबवर विजय मिळवला. निकी जॅक्सनच्या (90 मि.) स्वयंगोलने युनायटेडचा विजय निश्चित केला. कोलोरॅडोकडून केलीन अॅकोस्टा (82 मि.) याने गोल केला.
Wayne Rooney literally shedding blood for the D.C United cause... pic.twitter.com/OGal3EoV2h
— Pat McCarry (@patmccarry) July 29, 2018
सामन्याच्या शेवटच्या मिनिटाला रूनीच्या कपाळाला मार लागला आणि त्यातून रक्तस्राव सुरू झाला. 94 व्या मिनिटाला पेनल्टी बॉक्सच्या आत कोलोरॅडोचा बचावपटू अॅलेक्स सीजॉर्ब आणि रूनी यांच्यात टक्कर झाली. त्यानंतर रूनीच्या कपाळातून रक्त वाहू लागले आणि लगेचच ते चेह-यावर पसरले. हे पाहून चाहतेही घाबरले. रक्तबंबाळ रूनीच्या मदतीला त्वरित वैद्यकीय कर्मचारी धावले. रूनीला कपाळावर पाच टाके बसल्याची माहिती वैद्यकीय अहवालातून देण्यात आली.
Wayne Rooney opens his MLS account! #DCvCOLhttps://t.co/XuKvh1sVea
— Major League Soccer (@MLS) July 29, 2018