मॅराडोना यांची गोल्डन बॉल ट्रॉफी गेली चोरीला; उत्तराधिकाऱ्यांनी दिली माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2024 09:42 AM2024-05-15T09:42:48+5:302024-05-15T09:45:04+5:30

फिफा विश्वचषक स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूला गोल्डन बॉल ट्रॉफी प्रदान केली जाते.

maradona golden ball trophy stolen | मॅराडोना यांची गोल्डन बॉल ट्रॉफी गेली चोरीला; उत्तराधिकाऱ्यांनी दिली माहिती

मॅराडोना यांची गोल्डन बॉल ट्रॉफी गेली चोरीला; उत्तराधिकाऱ्यांनी दिली माहिती

पॅरिस : महान फुटबॉलपटू डिएगो मॅराडोना यांच्या १९८६ सालच्या फिफा विश्वचषक स्पर्धेतील गोल्डन बॉल ट्रॉफीचा पुढील महिन्यात लिलाव होणार होता. मात्र, ही ट्रॉफी चोरीला गेली असून, हा लिलाव रोखण्यासाठी गुन्हा दाखल करणार असल्याचे मॅराडोनाच्या उत्तराधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांच्या वकिलांनी मंगळवारी याबाबत माहिती दिली.

फिफा विश्वचषक स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूला गोल्डन बॉल ट्रॉफी प्रदान केली जाते. मॅराडोना यांना मिळालेली ही ट्रॉफी सुमारे दशकभर गायब होती आणि नुकतीच ती पुन्हा सर्वांसमोर आली होती. अगुटेस ऑक्शन हाउसने गेल्याच आठवड्यात या ट्रॉफीचा पुढील महिन्यात लिलाव होणार असल्याचे जाहीर केले होते. २०२० मध्ये मॅराडोना यांचे वयाच्या ६०व्या वर्षी निधन झाले होते.

 

Web Title: maradona golden ball trophy stolen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.