मेस्सी ठरला तारणहार, अर्जेंटिना विश्वचषक फुटबॉलसाठी पात्र, इक्वेडोरवर 3-1 ने मात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2017 11:55 AM2017-10-11T11:55:30+5:302017-10-11T12:00:15+5:30
स्टार खेळाडू लियोनेल मेस्सीच्या हॅटट्रीकच्या जोरावर अर्जेंटिना विश्वचषक फुटबॉल 2018 मधील आपले स्थान पक्के केले आहे.
ब्युनॉस आयर्स - स्टार खेळाडू लियोनेल मेस्सीच्या हॅटट्रीकच्या जोरावर अर्जेंटिना विश्वचषक फुटबॉल 2018 मधील आपले स्थान पक्के केले आहे. जीवन- मरणाच्या सामन्यात त्यांनी इक्वेडोरवर 3-1 असा विजय मिळवला.
या सामन्यात मेस्सीने 11, 18 आणि 62 व्या मिनिटाला गोल केले. त्याआधी इक्वेडौरच्या झेवियर माश्जेरानो याने 38 व्या सेकंदालाच गोल केला होता. विश्वचषक पात्रता फुटबॉल स्पर्धेच्या इतिहासात हा दुसरा सर्वात जलद गोल ठरला.
दक्षिण अमेरिकन गटातून विश्वचषकासाठी पात्र ठरण्यासाठी अर्जेंटिनाला हा सामना जिंकावाच लागणार होते. या सामन्याआधी ते गटात सहाव्या स्थानी होते आणि पहिले चार संघच रशिया 2018 साठी पात्र ठरणार होते. इक्वेडोरवरील विजयानंतर आता अर्जेंटिना गटात तिसऱ्या स्थानी असून ऊरुग्वे, कोलंबिया आणि ब्राझीलसह विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे.