'मेस्सी कसला लीडर, जो सामन्यापूर्वी 20 वेळा टॉयलेटला जातो'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 11:45 AM2018-10-15T11:45:41+5:302018-10-15T11:46:11+5:30
फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील अर्जेंटिना संघाच्या कामगिरीनंतर कर्णधार लिओनेल मेस्सीच्या खेळावर टीका करण्यात आली.
माद्रिद : फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील अर्जेंटिना संघाच्या कामगिरीनंतर कर्णधार लिओनेल मेस्सीच्या खेळावर टीका करण्यात आली. मात्र, हाच मेस्सी बार्सिलोना क्लबकडून खेळताना सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. राष्ट्रीय संघाकडून खेळताना मेस्सीवर प्रचंड दबाव जाणवते आणि त्यामुळेच त्याच्या कामगिरीवर परिणाम होतो, असे जाणकारांचे मानणे आहे. मात्र, अर्जेंटिनाचे दिग्गज खेळाडू डिएगो मॅरेडोना यांनी मेस्सीवर बोचरी टीका केली.
राष्ट्रीय संघाकडून खेळणारा आणि बार्सिलोना क्लबकडून खेळणारा मेस्सी हा वेगवेगळा असतो, असे मत अनेकांनी व्यक्त केले. ते म्हणाले,'' बार्सिलोनाकडून खेळणारा मेस्सी राष्ट्रीय संघाच्या जर्सीत वेगळा असतो. तो एक चांगला खेळाडू आहे, परंतु लीडर नाही. कोणताही सामना सुरू होण्यापूर्वी 20 वेळा टॉयलेटला जाणारा खेळाडू चांगला लीडर कसा असू शकतो.''
31 वर्षीय मेस्सीने पाच वेळा फिफाचा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जिंकला आहे. मात्र, राष्ट्रीय संघाकडून त्याला सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. 2014च्या विश्वचषक स्पर्धेत अर्जेंटिनावा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले, तर 2018 मध्ये त्यांनी निराशाच केली. याशिवाय कोपा अमेरिका स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करूनही त्यांना एकदाही जेतेपदाचा चषक उंचावता आला नाही.