इंग्लंडमध्ये विश्वचषक पाहण्याचा नवा विक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 03:42 AM2018-06-20T03:42:55+5:302018-06-20T03:42:55+5:30
इंग्लंड संघ यंदाच्या विश्वचषकात जेतेपदाच्या दावेदारीत नसेलही पण ट्युनिशियावर २-१ ने काल रात्री साजरा केलेल्या विजयामुळे या देशाने नवा विक्रम नोंदविला.
लंडन: इंग्लंड संघ यंदाच्या विश्वचषकात जेतेपदाच्या दावेदारीत नसेलही पण ट्युनिशियावर २-१ ने काल रात्री साजरा केलेल्या विजयामुळे या देशाने नवा विक्रम नोंदविला. अखेरच्या क्षणी मिळालेल्या विजयाचा क्षण इंग्लंडच्या १.८३ कोटी चाहत्यांनी पाहिला. हा नवा विक्रम आहे.
रशियातील वोल्गो ग्राद येथे खेळविण्यात आलेल्या या सामन्यात इंग्लिश कर्णधार हॅरी केन याने इन्जुरी टाईममध्ये गोल नोंदवून संघाला २-१ ने विजय मिळवून दिला. सामना टीव्हीवर ६९.२ टक्के प्रेक्षकांनी पाहिला. प्रेक्षक संख्येचा आकडा बघता या सामन्याने मागील महिन्यात झालेल्या शाही लग्नाच्या उपस्थितीचाही विक्रम मोडीत काढला आहे. याशिवाय जवळपास ३० लाख लोकांनी सामना आॅनलाईन पाहिला. लाईव्ह प्रेक्षकांच्या बाबतीत बीबीसीने नवा विक्रम स्थापन केला आहे. (वृत्तसंस्था)