FIFA U-17 World Cup : नवी मुंबईत गोल बरसले, भर पावसातही फुटबॉलप्रेमींचा उत्साह

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2017 08:26 PM2017-10-06T20:26:18+5:302017-10-07T03:34:23+5:30

भर पावसामध्ये झालेल्या १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या सलामी सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध तुर्की लढत १-१ अशी बरोबरीत राहिली.

 New Zealand - Turkey match level, Ahmad Kutucha, Max Mata's goal | FIFA U-17 World Cup : नवी मुंबईत गोल बरसले, भर पावसातही फुटबॉलप्रेमींचा उत्साह

FIFA U-17 World Cup : नवी मुंबईत गोल बरसले, भर पावसातही फुटबॉलप्रेमींचा उत्साह

Next

रोहित नाईक
नवी मुंबई : १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेच्या सलामीच्या लढतीआधी पावसाने हजेरी लावल्यानंतर गोलचा वर्षाव झाला. बलाढ्य पॅराग्वेने मालीविरुध्द ३-२ असा रोमांचक विजय मिळवत शानदार विजयी सलामी दिली. दोन्ही संघांनी केलेल्या आक्रमक खेळामुळे फुटबॉलप्रेमींना जल्लोष करण्याची संधी मिळाली.

नेरुळ येथील डॉ. डीवाय पाटील स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात पावसाने हजेरी लावल्यानंतर प्रेक्षकांचा हिरमोड झाला. परंतु, पॅराग्वे आणि माली यांनी धडाकेबाज खेळ करत फुटबॉलप्रेमींचे चांगलेच मनोरंजन केले. पहिल्या ३५ मिनिटांमध्येच चार गोल झाल्याने प्रेक्षकांनी स्टेडियम डोक्यावर घेतले. पॅराग्वेने तुफान सुरुवात करताना पहिल्या १७ मिनिटांमध्ये २-० अशी आघाडी घेतली. अँटोनिओ गालेआनो याने १२व्या मिनिटाला, तर लिओनार्डो सांचेझ याने १७व्या मिनिटाला गोल केला. यानंतर मालीनेही जोरदार प्रत्युत्तर दिले. हाद्जी डेÑम याने २०व्या मिनिटाला मालीकडून पहिला गोल केल्यानंतर ३४व्या मिनिटाला लस्साना एनडिये याने शानदार वेगवाग गोल करत मालीला २-२ अशी बरोबरी साधून दिली.

मध्यंतराला बरोबरी कायम राहिल्यानंतर दुसºया सत्रात ५५व्या मिनिटाला पॅराग्वेला पेनल्टी किक मिळाली. ही संधी अचूकपणे साधत अ‍ॅलेन रॉड्रिग्जने पॅराग्वेला ३-२ अशी महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. हीच आघाडी अखेरपर्यंत कायम राखत पॅराग्वेने स्पर्धेत विजयी सलामी दिली.

तत्पूर्वी झालेल्या सामन्यात न्यूझीलंड व तुर्की यांनी १-१ अशी बरोबरी साधली. पहिल्या सत्रात आक्रमक खेळ केलेल्या तुर्कीने आघाडी घेतल्यानंतर दुसºया सत्रात न्यूझीलंडने पुनरागमन करताना सामना बरोबरी राखला. तुर्कीने आक्रमक सुरुवात करताना आपला इरादा स्पष्ट केला. १८व्या मिनिटाला अहमद कुतुचु याने उजव्या बाजूने आलेल्या पासवर उत्कृष्ट हेडर करुन तुर्कीला आघाडीवर नेले . न्यूझीलंडने दुसºया सत्रात जोरदार प्रत्युत्तर दिले. ५८ व्या मिनिटाला कर्णधार मॅक्स माटा याने तुर्कीच्या गोलक्षेत्रात मुसंडी मारत अप्रतिम गोल करत न्यूझीलंडला १-१ अशी बरोबरी साधून दिली.

पावसाची दमदार सलामी
सामना सुरु होण्याआधी जोरदार वाºयांसह पावसानेही हजेरी लावल्याने डीवाय पाटील स्टेडियमवर फुटबॉलप्रेमींची तारांबळ उडाली. वीज गडगडाटांसह पाऊस कोसळू लागल्याने स्पर्धा आयोजकांवरही काहीसे दडपण आले. त्याचबरोबर जोरदार वाहणा-या वा-यांमुळे मैदानावरील खेळाडूंचे डगआऊट दोनदा कोसळले. त्यामुळे स्वयंसेवकांना अधिक कसरत करावी लागली. दरम्यान, काहीवेळाने पावसाचा जोर ओसरल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आणि न्यूझीलंड विरुद्ध तुर्की सामना निर्धारीत वेळेत सुरु झाला.

मैदानात घुसला कुत्रा...
सामन्यातील ६२व्या मिनिटाच्या सुमारासह एक भटका कुत्रा अचानकपणे मैदानात घुसला. यावेळी, त्याने संपुर्ण मैदानाला चक्कर मारल्याने खेळ काहीवेळ थांबविण्यात आला. या श्वानाला नियंत्रणात आणण्यासाठी स्पर्धा स्वयंसेवकांनी मोठी फिल्डिंग लावली. मात्र, सर्वांनाच चकवा देऊन त्या कुत्र्याने मैदान सहजासहजी सोडले नाही. अखेरीस, सर्व बाजूंनी स्वयंसेवकांनी कोंडी केल्यानंतर कुत्र्याने मैदानाबाहेरचा रस्ता पकडला आणि सामना पुन्हा सुरु झाला.

Web Title:  New Zealand - Turkey match level, Ahmad Kutucha, Max Mata's goal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.