नेयमारचं जबरदस्त कमबॅक; गोल पाहून म्हणाल, 'स्टार इज बॅक'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2018 05:17 PM2018-06-04T17:17:55+5:302018-06-04T17:19:57+5:30
एवढंच नव्हे त्याने पदार्पणाच्या सामन्यात जो गोल केला तो पाहून तुम्हाला थक्क व्हायला होईल आणि हा गोल पाहून तुम्हीच म्हणाल, 'स्टार इज बॅक'.
नवी दिल्ली : ज्याच्यावर ब्राझीलसारख्या दादा फुटबॉल संघाची भिस्त होती, असा नेयमार आता पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. एवढंच नव्हे त्याने पदार्पणाच्या सामन्यात जो गोल केला तो पाहून तुम्हाला थक्क व्हायला होईल आणि हा गोल पाहून तुम्हीच म्हणाल, 'स्टार इज बॅक'.
फुटबॉल विश्वचषकापूर्वी काही सराव सामने खेळवले जात आहेत. या सराव सामन्यांमध्ये ब्राझीलचा सामना क्रोएशियाशी सुरु होता. या सामन्यात नेयमार खेळणार की नाही, याची जोरदार चर्चा सुरु होती. कारण फेब्रुवारी महिन्यात नेयमारच्या पायाला दुखापत झाली होती. त्यानंतर नेयमार तंदुरुस्त असल्याच्या बातम्या येत होत्या, पण नेयमारला मैदानात पाहण्यासाठी त्याचे चाहते आसुरलेले होते.
ICYMI, looks like @neymarjr is back right on time 💥🤯pic.twitter.com/Zs8YN9oZ05
— FIFA World Cup 🏆 (@FIFAWorldCup) June 3, 2018
क्रोएशियाविरुद्धच्या सामन्यात 45 व्या मिनिटाला नेयमारला मैदानात उतरवण्यात आले. त्याळी प्रेक्षकांनी नेयमारच्या नावाने एकच जल्लोष केला. मैदानात उतरल्यावर 24 मिनिटांमध्येच नेयमारने जो गोल केला, त्याला तोड नव्हती. कारण क्रोएशियाच्या तीन बचावपटूंना भेदक नेयमारने गोल केला. त्यावेळी क्रोएशियाच्या संघालाही मोठा धक्का बसला. नेयमारने लिओनेल मेस्सीच्या शैलीत केलेल्या हा गोलची फुटबॉल विश्वात सध्याच्या घडीला सर्वात जास्त चर्चा केली जात आहे.
नेयमारने सामन्याच्या 69व्या मिनिटाला गोल करत ब्राझीलला खाते उघडून दिले. त्यानंतर सामन्याच्या 93व्या मिनिटाला रॉबर्ट फर्मिनोने दुसरा गोल करत संघाची आघाडी दुपट्ट केली. त्यामुळेच ब्राझीलला क्रोएशियावर 2-0 असा विजय मिळवता आला.