घानाविरुद्ध नायजरला संधीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 12:38 AM2017-10-18T00:38:43+5:302017-10-18T00:39:06+5:30
कुठल्याही संघाची ताकद त्यांच्यातील विश्वासावरून कळते. दोन वेळेचा फिफा अंडर-१७ चॅम्पियन घाना सध्या विश्वासाच्या लहरीवर स्वार आहे. स्पर्धा निर्णायक अवस्थेत पोहोचली नसली तरी घाना संघाचे विरोधक देखील हा संघ तिस-यांदा चॅम्पियन बनू शकतो.
- गुरुप्रीतसिंग संधू
कुठल्याही संघाची ताकद त्यांच्यातील विश्वासावरून कळते. दोन वेळेचा फिफा अंडर-१७ चॅम्पियन घाना सध्या विश्वासाच्या लहरीवर स्वार आहे. स्पर्धा निर्णायक अवस्थेत पोहोचली नसली तरी घाना संघाचे विरोधक देखील हा संघ तिस-यांदा चॅम्पियन बनू शकतो, अशी कबुली देतात.
घानाचे खेळाडू शारीरिकदृष्ट्या सुदृढ आहेतच शिवाय तांत्रिकदृष्ट्या भक्कम आहेत. तरीही हा सामना सहजपणे घेता येणार नसल्याची जाणीव घानाला आहे. विजयासाठी नायजरला सर्वस्व पणाला लावावे लागेल. खेळात काहीही शक्य आहे. बलाढ्य संघाला निराशा पत्करावी लागते. संतुलित असल्याचे आपल्याला वाटत असतानाच पराभवाचा जोरदार धक्का बसतो.
घानाच्या युवा संघाची ताकद आहे ती जोरदार हल्ला चढविणे. गोल करण्याची शक्यता निर्माण करणे. उत्कृष्ट समन्वयाच्या बळावर या संघातील खेळाडू वेळेची मागणी लक्षात घेऊन खेळतात, ही या संघाची आणखी एक विशेषता.
नायजर संघाने या सामन्याआधी बरीच खलबते केली असतील, असे मला वाटते. पण याचा उलट परिणाम असाही होतो की एखादा संघ आपल्या खेळापेक्षा प्रतिस्पर्धी संघाचाच विचार अधिक करायला लागतो. नायजर संघाने देखील हे ध्यानात घ्यावे. आपल्याला मैदानावर काय पवित्रा घ्यायचा आहे हे विसरू नये. स्वत:च्या डावपेचांवर कायम असावे. संयम पाळावा. घाना संघ थकलेला आहे, हे ओळखण्याइतपत प्रतीक्षा करावी. संधी येताच अलगद गोल जाळीचा वेध देखील घ्यावा. सुरुवातीचे दडपण झुगारुन लावण्यासाठी नायजरच्या खेळाडूंनी चेंडू सतत पास करीत रहायला हवा.
लढतीचा निकाल टायब्रेकरपर्यंत लांबेल, ही शक्यता नाकारता येत नाही. नायजरकडे यावर देखील काहीना काही तोडगा नक्कीच
असेल. पण ही एकमेव योजना डोक्यात ठेवून चालणार नाही. आफ्रिकेतील संघ काहीतरी वेगळाच विचार करतात. खेळात वेगवेगळे
तंत्र अवलंबतात. हे तंत्र पाहणे
फार मजेदार असते. जोखिम पत्करून खेळणे आणि नवे तंत्र मैदानावर अचूकपणे अमलात आणणे यामुळेच आफ्रिकेतील फुटबॉल संघाची योग्यता सरस ठरते.आफ्रिका खंडातील या दोन्ही संघांमधील लढत रोमहर्षक ठरेल, अशी मला खात्री आहे. (टीसीएम)