पॅराग्वेची लढत अमेरिकेशी, १७ वर्षाआतील विश्वचषक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 02:21 AM2017-10-16T02:21:45+5:302017-10-16T02:22:00+5:30
आत्मविश्वासाने पूर्ण असलेला पॅराग्वे संघाचा सामना सोमवारी नवी दिल्लीत अमेरिकेसोबत होणार आहे. या सामन्यात दोन्ही संघात फुटबॉल चाहत्यांना कांटे की टक्कर बघायला मिळेल. दोन्ही संघ उपउपांत्यपूर्व फेरीतील या संधीचा नक्कीच फायदा घेतील.
नवी दिल्ली : आत्मविश्वासाने पूर्ण असलेला पॅराग्वे संघाचा सामना सोमवारी नवी दिल्लीत अमेरिकेसोबत होणार आहे. या सामन्यात दोन्ही संघात फुटबॉल चाहत्यांना कांटे की टक्कर बघायला मिळेल. दोन्ही संघ उपउपांत्यपूर्व फेरीतील या संधीचा नक्कीच फायदा घेतील.
पॅराग्वेने साखळी फेरीतील आपले सर्व सामने जिंकत अंतिम १६ मध्ये प्रवेश केला. त्यामुळे संघाचे मनोबल नक्कीच उंचावलेले आहे. साखळी फेरीतील तिन्ही सामन्यात संघाने एकूण १० गोल केले. त्यामुळे दक्षिण अमेरिकन फुटबॉल संघ पॅराग्वेचे खेळाडू किती प्रतिभावान आहे हे अमेरिकेच्या लक्षात आलेच असेल. न्यूझीलंडविरोधात पिछाडीवर पडल्यावरदेखील त्यांनी जोरदार पुनरागमन करत आपण मानसिकदृष्ट्या किती खंबीर आहोत, हे दाखवून दिले. तुर्की आणि माली विरोधात संघ खूपच आक्रमक राहिला.
अमेरिकेचा संघ कोलंबियाकडून पराभूत झाला आहे. त्यामुळे हा संघ या स्पर्धेत सर्वात धोकादायक ठरू शकतो, याची जाणीव पॅराग्वेच्या व्यवस्थापनाला नक्कीच असेल. अमेरिकेने यजमान भारताला ३-० ने पराभूत करत आपल्या अभियानाची शानदार सुरुवात केली, आणि नंतर दोन वेळच्या विजेत्या घाना संघाला पराभूत केले. मात्र कोलंबियाने त्यांचा पराभव केला.
पॅराग्वेने आतापर्यंत या स्पर्धेत ज्या पद्धतीने खेळ केला आहे. तो पाहता अमेरिकेला नक्कीच कडवे आव्हान मिळेल. अमेरिकेचा स्टार स्ट्रायकर जोस सार्जेंट आणि अॅण्ड्र्यू कार्लटन यांच्याकडून दमदार खेळाची अपेक्षा केली जात आहे.
(वृत्तसंस्था)
युरोपियन फुटबॉल कौशल्याचे होणार दर्शन
नवी दिल्ली : १७ वर्षाआतील फुटबॉल विश्वचषकात जर्मन संघाला आतापर्यंत आपल्या ख्यातीनुसार खेळ करता आलेला नसला तरी सोमवारी लॅटिन अमेरिकन कोलंबियाशी होणारा सामना हा रोमांचक होण्याची आशा आहे. या सामन्यातून जर्मनीला आपला खेळ दाखवण्याची संधी मिळेल. हा सामना पाच वाजता जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये होणार आहे.
या सामन्यात जर्मनीला कडवा संघर्ष करावा लागणार आहे. त्यामुळे नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू मैदानात लॅटिन अमेरिकन आणि युरोपियन फुटबॉलचे दमदार कौशल्य पाहायला मिळेल. यात गोलकीपरची भूमिका महत्त्वाची ठरेल. कारण दोन्ही संघांचा नैसर्गिक खेळ हा आक्रमक आहे.
दोन्ही संघ प्रतिस्पर्ध्यांच्या गोलपोस्टवर हल्ले करण्यात तरबेज आहेत. आणि उद्याच्या सामन्यात गोलपोस्टवर जास्तीत जास्त हल्ला चढवून प्रतिस्पर्ध्यांचा बचाव उधळून लावण्याचे त्यांचे प्रयत्न असतील. दोन्ही संघांचा स्तर, अनुभव पाहता प्रेक्षकांना एक कडवा सामना पहायला मिळेल. दोन्ही संघांची बचाव फळीदेखील मजबूत आणि विश्वासार्ह आहे. त्यामुळे फॉरवर्ड खेळाडू आक्रमक होऊन रणनीती राबवू शकतात. या स्पर्धेत दोन्ही संघांची कामगिरी सामन्यागणिक चांगली होत आहे. जर्मनीची या विश्वचषकातील कामगिरी फारशी चांगली नाही. त्यांनी चार वेळाच उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आणि अन्य कोणत्याही युरोपीय संघापेक्षा ४४ सामने जास्त खेळलेले आहेत. जर्मनीने १९८५ मध्ये या स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले होते. ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी होती. जर्मन संघ या वेळी कोणतीही कसर सोडणार नाही.
त्याचप्रमाणे दक्षिण अमेरिकन संघ कोलंबियादेखील फुटबॉलमधील एक मोठे नाव आहे.
त्यांनी आतापर्यंत एकही विश्वचषक पटकावलेला नसला तरी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये आपला दबदबा राखला आहे. कोलंबिया सहाव्यांदा या स्पर्धेत सहभागी झाला आहे. २००९ मध्ये त्यांनी उपांत्य फेरीतील पराभवानंतर तिसरे स्थान राखले होते. ही त्यांची या स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी आहे. त्यांच्या कामगिरीतदेखील बरीच सुधारणा झाली आहे.
साखळी फेरीत सुरुवातीला जर्मनीला इराककडून पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर संघाच्या कामगिरीत बरीच सुुधारणा झाली आहे.
भारतीय खेळाडूंनी केले फिफा अधिका-यांना प्रभावित
कोलकाता : भारतीय संघ फिफा १७ वर्षाआतील फुटबॉल विश्वचषकातून बाहेर पडला आहे. मात्र खेळाडूंच्या कामगिरीने फिफाचे अधिकारी प्रभावित झाले आहे. फिफाचे अधिकारी प्रशिक्षण आणि खेळाडू विकास विभागाचे प्रमुख ब्रानीमीर उजेविच यांनी भारताला भविष्यावर लक्ष देण्याबाबत सांगितले आहे.
भारतीय संघाला फिफा १७ वर्षाआतील विश्वचषकाच्या सुरुवातीच्या लढतीत अमेरिकेने ०-३ ने पराभूत केले. मात्र त्यांनी दुसºया सामन्यात दमदार खेळ केला आणि बरोबरी केली. मात्र अखेरच्या मिनिटाला गोल केल्याने त्यांचा पराभव झाला आणि या स्पर्धेत गुण मिळवण्याची संधी गेली.
साल्टलेक स्टेडियममध्ये साखळी फेरीच्या लढती संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना उजेविच म्हणाले ,‘हे नक्की आहे की, त्यांनी पहिल्या सामन्यात सर्वांना प्रभावित केले. मात्र दुसºया सामन्यात कोलंबियाविरोधात त्यांनी आणखी चांगला खेळ केला. ते रणनीतीक आणि शारीरिक रूपाने तयार होते. भारताने संघटित खेळ केला. त्यांनी सांगितले की,‘भारताने या सामन्यात गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या. ते स्पर्धेतील पहिला गोल केल्याने भावुक झाले होते आणि भावनेच्या भरात गोलपोस्टचे रक्षण करण्याचे विसरले.’ उजेविच म्हणाले की,‘ मी आशा करतो की या प्रकारच्या सामन्यातून ते काही शिकतील.’
(वृत्तसंस्था)