Pele FIFA World Cup 2022: "आज ते नक्कीच खूश असतील...", अर्जेंटिनाच्या विजयावर रुग्णालयातून पेले यांचा इमोशनल मेसेज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 03:40 PM2022-12-19T15:40:59+5:302022-12-19T15:41:10+5:30
ब्राझीलचे महान फुटबॉल खेळाडू पेले यांनी अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सी याला वर्ल्डकप विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
नवी दिल्ली-
ब्राझीलचे महान फुटबॉल खेळाडू पेले यांनी अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सी याला वर्ल्डकप विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासोबतच त्यांनी फ्रान्सच्या एम्बापेचंही कौतुक केलं आहे. ब्राझीलसाठी तीनवेळा विश्वविजयाचं स्वप्न जगलेल्या पेले सध्या श्वसनासंदर्भातील तक्रारीमुळे रुग्णालयात उपचार घेत आहेत.
कतारच्या लुसैल स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या फायनलमध्ये अर्जेंटिनानं फ्रान्सवर पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ नं विजय प्राप्त केला आणि इन्स्टाग्रामवर एक मेसेज पोस्ट केला आहे. अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यातील सामना अतिरिक्त वेळेनंतरही ३-३ असा बरोबरीत होता. त्यामुळे पेनल्टी शूटआऊटमध्ये सामन्याचा निकाल लागला.
पेले म्हणाले, "फुटबॉलनं आज पुन्हा एकदा आपली कहाणी रोमांचक पद्धतीनं सादर केली. मेस्सीनं आपला पहिलावहिला विश्वचषक जिंकला ज्यावर त्याचा नक्कीच अधिकार होता. माझा प्रिय मित्र एम्बापेनं फायनलमध्ये चार (पेनल्टी शूटआऊटच्या एका गोलसह) गोल केले. खेळाच्या भविष्यासाठी थरारक सामना रंगणं हे एका रोमांचक गिफ्टपेक्षा कमी नव्हतं"
फायनलमध्ये मेस्सीनं दोन गोल केले. तर फ्रान्सच्या एम्बापेनं तीन गोल केले. पेले यांनी सेमीफायनलमध्ये दाखल झालेल्या आफ्रिकी देश मोरक्कोचं देखील कौतुक केलं. तसंच आपल्या पोस्टच्या शेवटी म्हटलं की, आज अर्जेंटिनाचे महान खेळाडू डिएगो मॅराडोना देखील नक्कीच खूश झाले असतील.
फिफा फायनलमध्ये झालेले गोल
अर्जेंटिना- ३ गोल
मेस्सी- २३ व्या मिनिटाला
डी. मारिया- ३६ व्या मिनिटाला
मेस्सी- १०८ व्या मिनिटाला
फ्रान्स- ३ गोल
एम्बापे- ८० व्या मिनिटाला
एम्बापे- ८१ व्या मिनिटाला
एम्बापे- ११८ व्या मिनिटाला
पेनल्टी शूटआउटची कहाणी..
फ्रान्स- एम्बापे (गोल)
अर्जेंटिना- मेस्सी (गोल)
फ्रान्स- कोमान (मिस)
अर्जेंटिना- पाऊलो डायबाला (गोल)
फ्रान्स- एयुरेलियन टी. (मिस)
अर्जेंटिना- लिएंड्रो परेडेस (गोल)
फ्रान्स- रँडर कोलो मुआनी (गोल)
अर्जेंटिना- गोंजालो मोंटिएल (गोल)