चर्चिल-आवेर्तानची प्रतिष्ठा पणाला!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 01:56 PM2018-10-27T13:56:13+5:302018-10-27T13:56:40+5:30

जीएफएची आज निवडणूक : गोमंतकीय फुटबॉल चाहत्यांचे लक्ष

Political turn to football elections | चर्चिल-आवेर्तानची प्रतिष्ठा पणाला!

चर्चिल-आवेर्तानची प्रतिष्ठा पणाला!

Next

सचिन कोरडे : राज्यातील सर्वात मोठी संघटना असलेल्या गोवाफुटबॉल असोसिएशनच्या (जीएफए) निवडणुकीला पूर्णत: राजकीय वळण निर्माण झाले आहे. बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव, माजी मंत्री आवेर्तान फुर्तादो हे अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. दोघांचेही राजकारण हे मुख्य मैदान असले तरी त्यांच्यात फुटबॉलची आवड ही एक समानता आहे. फुर्तादो हे स्वत: खेळाडू होते तर माजी मुख्यंमत्री चर्चिल आलेमाव यांचे गोवा फुटबॉलसाठी मोठे योगदान आहे. चार दशकांपासून ते फुटबॉलची सेवा करीत आहेत. त्यामुळे  फुटबॉलच्या निवडणुकीसाठी राजकीय शक्तीचा वापर होताना दिसला. त्यामुळे या दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. उद्या (दि.२८) होणाºया या निवडणुकीकडे गोमंतकीय फुटबॉल चाहत्यांचे लक्ष लागले आहे. 
२०१२ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत नावेली मतदार संघात आवेर्तान आणि चर्चिल आलेमाव यांच्यात सामना झाला होता. यात आवेर्तान यांनी चर्चिलचा पराभव केला. बलाढ्य नेत्याचा झालेला पराभव चर्चेचा विषय ठरला होता. निश्चितच हा पराभव चर्चिल यांच्या जिव्हारी लागला होता. त्यामुळे चर्चिल आलेमाव आता ‘जीएफए’ अध्यक्षपदाची खुर्ची कशीच सोडणार नाहीत. आपणच ही निवडणूक जिंकणार, असा दावा त्यांनी केलेला आहे. लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम मशिनमुळे आपण पराभूत झालो होतो, असे ते सांगतात. आता बॅलेट पेपर मीच जिंकून येईल. फुटबॉलसाठी इतकी वर्षे सेवा दिल्यानंतर माझ्यावर क्लबचा विश्वास अधिक आहे. शंभरहून अधिक क्लब माझ्या पाठीशी आहेत. क्लबना खेळायला मैदानेच उपलब्ध नसतात. ती उपबल्ध करून देण्याची प्राथमिकता असेल. गोवा प्रोफेशनल लीगच्या बक्षिसांच्या रक्कमेत वाढ करण्याचा प्रयत्न असेल. याशिवाय इतरही विषय माझ्या डोक्यात आहेत. फुटबॉल खेळाची निगडीत समस्या सोडवण्याचा माझा प्रयत्न असेल,असे चर्चिल यांनी सांगितले आहे.  
दुसरीकडे, आवेर्तान फुर्तादो यांनी सुद्धा मैदानाचा मुद्दा प्राथमिक ठरवला होता. गोव्यात बरेच क्लब आहेत. रोज स्पर्धा सुरू असतात, मात्र मैदाने उपलब्ध नसतात. मैदानांची संख्या वाढावी. आहे ती विकसित कशी करता येईल. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. मी सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून फुटबॉल खेळतोय. त्यामुळे क्लब, खेळाडू, व्यवस्थापन यांच्या अडचणी समजू शकतो. चर्चिल आणि मी चांगले मित्र आहोत. दोघांमध्ये कुठलेही वैर नाही. मी ईव्हीएमद्वारे निवडून आलो असे ते सांगत असतील तर त्यांनी मला जादूगारही म्हणावे, कारण मी बॅलेट पेपरवर सुद्धा जिंकून येईल. क्लबचा मला चांगला पाठिंबा आहे. चर्चिल आलेमाव आता वयाची सत्तरी पार करीत आहेत. असे असताना ते का निवडणूक लढवत आहेत हेच मला कळत नाही. त्यांनी दुसºयांना संधी द्यावी, असे मला वाटते. मी मंत्री असताना माझ्या मतदारसंघात फुटबॉल विकासासाठी प्रयत्न केला. नावेली मैदान विकसित केले. त्यामुळे माझे या खेळाचे नाते जुळलेले आहे. तेच मी या निवडणुकीतून दाखवून देईल, असेही फुर्तादो म्हणाले. 
उपाध्यक्षपदासाठी उत्तर गोव्यातून लाविनो रिबेलो हे आग्नेलो अल्बकर्क यांना आव्हान देणार आहेत. आग्नेलो हे १९९५ पासून जीएफएच्या समितीत आहेत. गोव्यतील फुटबॉल क्षेत्रात हे नाव लोकप्रिय आहे. परंतु, लाविनो यांनी गेल्या काही वर्षात दिलेले योगदानही न विसरण्यारखे आहे. त्यामुळे ही लढतही रंगतदार होईल, असे दिसते. 
दरम्यान, गोव्यात एकूण १६० क्लब आहेत. त्यातील सर्वाधिक ७१ क्लब सालसेत (दक्षिण गोवा) मध्ये आहेत. निश्चितच, सालसेतमधील मते निर्णायक ठरतील.

Web Title: Political turn to football elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.