पॉर्नला फुटबॉलची 'किक'; विश्वचषकादरम्यान आंबटशौकिनांचा पॉर्न साइट्सना 'कॉर्नर'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 12:16 PM2018-07-19T12:16:46+5:302018-07-19T12:17:13+5:30
फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेदरम्यान पॉर्न साइट्स पाहणा-या आंबटशौकिनांच्या संख्येत घट झाल्याचा अहवाल समोर आला आहे.
मुंबई - फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेदरम्यान पॉर्न साइट्स पाहणा-या आंबटशौकिनांच्या संख्येत घट झाल्याचा अहवाल समोर आला आहे. रशियात झालेल्या या स्पर्धेत फ्रान्सने अंतिम लढतीत क्रोएशियावर 4-2 असा विजय मिळवून जेतेपदाला गवसणी घातली. फुटबॉल विश्वचषकाच्या रंगात संपूर्ण जग रंगून गेले होते. या स्पर्धा कालावधीत पॉर्न साइटला भेट देणा-यांच्या संख्येत प्रचंड घट झाल्याचा अहवाल 'पॉर्नहब' या साइटने सादर केला आहे.
स्पर्धेत खेळणा-या प्रत्येक संघांच्या सामन्यादरम्यान त्या त्या देशात पॉर्न साइट पाहणा-यांची संख्या घटली होती. त्यात सर्वाधिक घट ही फ्रान्स आणि क्रोएशिया यांच्यातील अंतिम लढतीत पाहायला मिळाली. जेतेपदाच्या लढतीला सुरूवात होण्यापूर्वी क्रोएशियातील पॉर्न साइट पाहणा-यांची संख्या 46 टक्क्यांनी, तर फ्रान्समध्ये 24 टक्क्यांनी कमी झाली होती. विशेष म्हणजे सामन्याच्या पहिल्या एका तासात क्रोएशियात पॉर्न साइटला भेट देणा-यांची संख्या सातत्याने घटून ती 68 टक्क्यांवर गेली होती. मात्र, सामन्याच्या अखेरच्या अर्ध्या तासात लोक पुन्हा पॉर्न साइटकडे वळली. फ्रान्समध्ये सामन्याच्या अखेरपर्यंत साइटला भेट देणारे घटले होते. जगभरात ही आकडेवारी 12 टक्क्याने कमी झाली होती.
फ्रान्स आणि बेल्जियम यांच्यातील उपांत्य फेरीतील सामन्यात फ्रान्समध्ये पॉर्न साइट पाहणारे 52 टक्क्यांनी कमी झाले होते. व्हेनेझुएलातही प्रचंड प्रमाणात घट पाहायला मिळाली. बल्गेरिया आणि स्लोव्हाकिया या देशांमध्ये हे प्रमाण अनुक्रमे 45 व 40 टक्क्यांनी घटले होते. स्वित्झर्लंड आणि हाँगकाँग येथेही हे प्रमाण अनुक्रमे 33 व 32 टक्के होते. अमेरिकेत मात्र विश्वचषक स्पर्धेचा फार परिणाम जाणवला नाही. येथे केवळ 5 टक्केच घट झाली.