Cristiano Ronaldo : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या गाडीचा अपघात, १६ कोटींच्या Bugattiची लागली वाट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 16:38 IST2022-06-21T11:43:14+5:302022-06-21T16:38:37+5:30
कुटुंबियांसह Majorca येथे सुट्टीवर गेलेल्या स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्या १६ कोटींच्या गाडीचा अपघात झाला आहे.

Cristiano Ronaldo : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या गाडीचा अपघात, १६ कोटींच्या Bugattiची लागली वाट!
कुटुंबियांसह Majorca येथे सुट्टीवर गेलेल्या स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्या १६ कोटींच्या गाडीचा अपघात झाला आहे. या अपघातात Bugatti गाडीची पूर्णपणे वाट लागली आहे, परंतु कोणाला दुखापत झालेली नाही. अपघात झाला तेव्हा गाडीत रोनाल्डोचा एक अंगरक्षक होता. मँचेस्टर युनायटेडसोबतच्या खराब सत्रानंतर रोनाल्डो रिफ्रेश होण्यासाठी काही दिवसांसाठी देशाबाहेर सुट्टीवर गेला आहे. तो त्याच्या पूर्ण कुटुंबियांसह मजोरका बेटावर आहे. तेथे फिरण्यासाठी त्याने एक गाडी ट्रान्सपोर्ट केली होती आणि त्याच गाडीचा अपघात झाला.
रोनाल्डोचा अंगरक्षक ही गाडी चालवत होता आणि तो एकटाच होता. त्याचं गाडीवरील नियंत्रण सुटलं. त्यामुळे गाडी दिवाळावर जोरदार आदळली आणि त्यात गाडीच्या समोरील भागाचा पूर्णपणे चुराडा झाला. हा अपघात चालकाचा नियंत्रण सुटल्यामुळे झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. तेथे उपस्थित एका व्यक्तिने सांगितले की, ही गाडी दिवाळावर जाऊन आदळळी, परंतु चालकाला दुखापत झाली नाही. चालकाने या अपघाताची जबाबदारी घेतली. पोलिसांनीही त्याच्या नावावर या अपघाताची नोंद केली. रोनाल्डोने २०१६ मध्ये युरो कप जिंकल्यानंतर ही गाडी खरेदी केली होती.
इंस्टाग्रामवर एका पोस्टमागे कमावतो ११.९ कोटी!
इंस्टाग्रामवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रेटीमध्ये पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो ( Christiano Ronaldo) अव्वल स्थानावर आहे. तो एका स्पॉन्सर्ड पोस्टमागे ११.९ कोटी रुपये कमावतो. रोनाल्डोच्या इंस्टाग्रामवरील फॉलोअर्सची संख्या ३० कोटींच्या घरात गेली. इतके फॉलोअर्स असलेला तो पहिलाच सेलिब्रेटी आहे. त्यानंतर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या सेलिब्रेटींमध्ये WWE स्टार ड्वेन जॉन्सन याचा क्रमांक येतो. त्याचे २४ कोटी फॉलोअर्स आहेत.
रोनाल्डोनं मार्च २०१९ ते मार्च २०२० या कालावधीत इंस्टाग्रामवरील कमाई ही ५०.३ मिलियन डॉलर इतकी आहे. फुटबॉल क्लब युव्हेंटससोबत त्यानं ३३ मिलियन डॉलरचा करार केला आणि त्यापेक्षा अधिक कमाई तो इंस्टाग्रामवरून करतो. २०१९मध्ये तो एका पोस्टमागे ६.७३ कोटी कमवत होता. खेळाडूंच्या बाबतीत विचार केला तर विराट कोहली चौथ्या क्रमांकावर आहे. लियोनेल मेस्सी व नेयमार हे अनुक्रमे ८.६ कोटी व ६.१ कोटींसह दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. टॉप १००मध्ये विराटसह बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा २७ व्या क्रमांकावर आहे. ती एका पोस्टमागे ३ कोटी कमावते.