फिफा अंडर-१७ विश्वकप स्पर्धेत खेळली जाणारी उपांत्य लढत माली विरुद्ध स्पेन अशी होण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 12:37 AM2017-10-25T00:37:59+5:302017-10-25T00:38:02+5:30
‘ग्लोबलायझेशन आॅफ फुटबॉल’ या शब्दाचा वापर खेळाची लोकप्रियता आणि जगभरात याला मान्यता असल्याचे सांगताना केला जातो, पण यापेक्षा याची व्याप्ती मोठी आहे.
गुरप्रीतसिंग संधू लिहितात...
‘ग्लोबलायझेशन आॅफ फुटबॉल’ या शब्दाचा वापर खेळाची लोकप्रियता आणि जगभरात याला मान्यता असल्याचे सांगताना
केला जातो, पण यापेक्षा याची व्याप्ती मोठी आहे. माझ्या मते, ग्लोबलायझेशनचा अर्थ पारंपरिक फुटबॉलशैलीचे नव्या शैलीसोबतचे मिश्रण असा आहे.
आफ्रिकन फुटबॉल आक्रमक आहे, तरी मालीचा खेळ मात्र थोडा वेगळा आहे. माली संघ आपला प्रतिस्पर्धी स्पेनप्रमाणे पिछाडीवर राहून खेळाची सुरुवात करण्यास पुढेमागे पाहत नाही. अशा स्थितीत फिफा अंडर-१७ विश्वकप स्पर्धेत बुधवारी खेळली जाणारी उपांत्य लढत माली विरुद्ध स्पेन अशी होण्याऐवजी काही प्रमाणात स्पेन विरुद्ध स्पेन अशी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, करिश्माई कर्णधार व शानदार मिडफिल्डर मोहम्मद कमाराच्या निलंबनामुळे माली संघाला मोठा धक्का बसला आहे. माली संघाच्या यशात कमाराचे योगदान मोलाचे आहे. त्याचे स्थान विशेषत: अशा प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भरून काढणे कठीण काम आहे.
बचावाचा विचार करता माली संघ अधिक मजबूत आहे, यात कुठलीच शंका नाही. त्यांनी अनेक गोल वाचविले आहेत, ही त्यांची विशेषता आहे. अन्य लढतींमध्ये घाना व जर्मनीचे संघ तसे करण्यात अपयशी ठरले आहेत. स्पेनच्या संघाला पराभूत करणे तसे सोपे काम नाही.
हा संघ समतोल असून अल्पावधीत सामन्याचे चित्र पालटण्याची त्यांच्यात क्षमता आहे. विविधता त्यांच्यातील सर्वांत मोठी विशेषता आहे. इराणविरुद्ध त्यांनी नोंदवलेल्या गोलबाबत विचार करा. त्यांनी बॉक्सच्या आतमधून आणि बाहेरूनही गोल नोंदवले. त्यांच्या खेळाचा अंदाज घेणे कठीण आहे. त्यांना पिछाडीवर ठेवण्याचा जेवढा प्रयत्न करतो तेवढीच ते आगेकूच करीत असतात.
शारीरिकदृष्ट्या विचार करता मालीच्या तुलनेत ते मजबूत आहेत. स्पेनच्या युवा खेळाडूंचा आत्मविश्वास महत्त्वाचा ठरणार आहे. या महत्त्वाच्या लढतीत मालीच्या तुलनेत अधिक सामने खेळण्याचा स्पेन संघाचा अनुभव उपयुक्त ठरू शकतो. त्यामुळे या लढतीत स्पेन संघाचे पारडे थोडे वरचढ आहे. (टीसीएम)