प्रफुल पटेल यांना कोर्टाचा दणका, फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदी झालेली निवड रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2017 07:59 PM2017-10-31T19:59:20+5:302017-10-31T20:00:38+5:30

दिल्ली उच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल पटेल यांना जोरदार दणका दिला आहे.

Praful Patel, the president of the football federation, has been canceled | प्रफुल पटेल यांना कोर्टाचा दणका, फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदी झालेली निवड रद्द

प्रफुल पटेल यांना कोर्टाचा दणका, फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदी झालेली निवड रद्द

Next

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल पटेल यांना जोरदार दणका दिला आहे. कोर्टानं त्यांचं अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष निवड रद्द केले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने पटेल यांना दणका देताना दिल्ली माजी मुख्य निवडणुक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांची फुटबॉल महासंघावर प्रशासक म्हणून नेमणूक केली आहे.

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाची नव्याने निवडणुकी घेण्यात याव्यात. ही निवडणूक 5 महिन्यांत घेण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत. फुटबॉल महासंघाने घेतलेल्या निवडणुकांमधून राष्ट्रीय क्रीडा संहितेचे उल्लंघन झाल्याचे मत न्यायालयाने नोंदवले आहे.  क्रीडा क्षेत्रात सुधारणांसाठी काम करणारे कार्यकर्ते राहुल मेहरा यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती एस. रविंद्र भट आणि न्या. नजमी वाझिरी यांच्या खंडपीठाने प्रफुल पटेल यांची निवड रद्दबातल ठरवली.

2008 साली फुटबॉल महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष प्रियरंजन दासमुन्शी यांचं निधन झालं. यानंतर 2009 साली प्रफुल पटेल यांनी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली. यानंतर आजपर्यंत प्रफुल पटेल फुटबॉल महासंघावर एकमताने निवडून येत आहेत. मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात फुटबॉल महासंघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रफुल पटेल यांची एकमताने अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. 

पटेल यांच्याच नेतृत्वाखाली फुटबॉल महासंघाने फिफाच्या 17 वर्षांखालील मुलांच्या विश्वचषकाचं यजमानपद भूषवलं होतं. याचसोबत भारताने 2019 साली 19 वर्षांखालील मुलांच्या विश्वचषकाच्या यजमानपदासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली आहे. 

Web Title: Praful Patel, the president of the football federation, has been canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.